Kalyan cobra Snake: कल्याणात भाजीच्या गठ्यात आढळला आक्रमक कोब्रा; भाजी विक्रेत्या महिलेसह खरेदीदारांची उडाली भंबेरी

हे पाहून महिला घाबरून दुकान सोडून मदतीसाठी याचना करू लागली.
Kalyan cobra Snake
Kalyan cobra SnakePudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण पश्चिमेकडे आधारवाडी रोडवरील उंबर्डे डीबी चौकात बुधवारी सकाळी एका भाजी विक्रेत्या महिलेच्या भाजीच्या गठ्यात कोब्रा नाग आढळून आल्याने संपूर्ण चौकात एकच खळबळ माजली होती. अचानक विषारी सर्प आढळून आल्याने भाजी विक्रेत्या महिलेसह तेथे आलेल्या खरेदीदारांची भीतीने गाळण उडाली होती.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी आली होती. भाजीचा गठ्ठा उघडताच त्यातून इंडियन कोब्रा जातीचा अत्यंत विषारी नाग बाहेर आला. हे पाहून महिला घाबरून दुकान सोडून मदतीसाठी याचना करू लागली.

Kalyan cobra Snake
Thane Railway Station: ठाणे रेल्वेस्थानकाने घेतला मोकळा श्वास

याच दरम्यान परिसरातील दक्ष नागरिकांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना तातडीने फोन केला. माहिती मिळताच दत्ता बाँबे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत शिताफीने त्या कोब्रा नागाला पकडले.

विशेष म्हणजे त्या दिवशी आषाढी अमावस्या असल्याने चौकात नेहमीपेक्षा गर्दी होती. भर चौकात भाजीच्या दुकानात अचानक नाग आल्याने फेरीवाले, विक्रेते आणि खरेदीदार घाबरून गेले होते. काही वेळासाठी चौकातील व्यवहार ठप्प झाले होते .

Kalyan cobra Snake
Raigad Car Stuck: कोंडविली आरावी बीचवर पर्यटकांची कार समुद्रात अडकली

मात्र साप पकडल्यानंतर चौकातील साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पकडलेला नाग इंडियन कोब्रा जातीचा असून अत्यंत विषारी आहे. कल्याण वन विभाग अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाजी आणि इतर साहित्य खरेदी/विक्री विक्रेत्यासह खरेदीदारांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news