friend assault death case | मारहाण केलेल्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू, चौकडीला अटक; आरोपींना पोलीस कोठडी

मारहाण केलेल्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू, चौकडीला अटक; आरोपींना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
prison
prison
Published on: 
Updated on: 

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मित्राने मित्राचा घेतलेला मोबाईल परत मागण्यासाठी गेलेल्या चौघानी मोबाईल देण्यास नकार देताच त्याला लाकडी दांडक्याने आणि पट्टयाने केलेल्या मारहाणीत इलियास नियाझ अहमद कुरेशी उर्फ सलिम (50) याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अवघ्या एका तासात चारही आरोपीनी मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

सदरची घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी 9 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्टेशन, पुर्व बाजुस रेल्वे पटरी जवळ घडली होती. अटक चारही आरोपीना न्यायालयाने 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

हत्येप्रकरणात अटक आरोपी परमेश्वर अंडागळे, मो. फिरोज हनीफ खान उर्फ कब्बु, अनिल चौरे व सुनिल पगारे यांचा समावेश आहे. मृतकाने आरोपी परमेश्वर लक्ष्मण अंडागळे याचा मोबाईल घेतला होता. सदर मोबाईल परत मागण्यासाठी आरोपी परमेश्वर अडांगळी हा आपले मित्र मोहम्मद फिरोज हनीफ खान उर्फ कबू अनिल चौरे आणि सुनील पगारे यांच्यासोबत मृतकाकडे मोबाईल मागण्यासाठी गेले होते.

prison
Glamour prostitution racket | ग्लॅमरच्या झगमगाटाआड देहव्यापाराचे काळे जाळे

दरम्यान मोबाईल वरून वाद-विवाद झाल्यानंतर मृतकाने मोबाईल देण्यास नकार दिल्या. त्यावेळी या चौघांनी त्याला लाकडी दांडक्याने आणि पट्ट्याने मारहाण केली या मारहाणी मृतक जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मृतक इलियास नियाझ अहमद कुरेशी उर्फ सलिम याचा कळवा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुंब्रा पोलिसांनी चौघांच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करून अवघ्या एका तासात चारही आरोपींना अटक केली. सोमवारी त्यांना पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

prison
Mira Bhayandar corporation |मिरा भाईंदर मनपा महासभेत हाणामारीप्रकरणी भाजपच्या 16 नगरसेवकांसह कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news