Glamour prostitution racket | ग्लॅमरच्या झगमगाटाआड देहव्यापाराचे काळे जाळे

९ महिन्यांत ५० हून अधिक पीडित महिलांची सुटका, चार महिन्यांत १८ दलालांना बेड्या
Prostitution
ProstitutionPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

आतापर्यंत ब्युटी सलून मसाज पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय मुलींना ठाण्यात आणून त्यांना देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात येत होते. मात्र सध्या वेब सिरीज व फिल्म मध्ये काम देण्याच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भामट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर त्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या मुलींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे मानवीय तस्करी विरोधी पथकाने व ठाणे पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यात अनैतिक व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या पन्नासहून अधिक मुलींची सुटका केली आहे. तर गेल्या चार महिन्यातच 18 दलालांना अटक करण्यात करण्यात आली आहे. त्यात अल्पवयीन मुली आणि वेब सिरीज व फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.

ठाण्यात हायफ्रॉफाईल सेक्स रॅकेटचे जाळे दिवसेंदिवस फोफावत असल्याचे पोलिसांच्या कारवाई नंतर स्पष्ट होत आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने नुकतेच टीव्ही सिरीयल व मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तीन तरुणींची सुटका केली. तर या तरुणींना गलिच्छ व्यवसायात ओढणाऱ्या एका महिला दलालास अटक केली. विशेष म्हणजे ही दलाल महिला देखील मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात काम करते. मॉडेलिंग क्षेत्रात येणाऱ्या तरुर्णीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलून ही महिला तरुणींना शरीरविक्रयच्या व्यवसायात ओढत होती असे पोलीस

Prostitution
KDMC News: अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख रेवडी निलंबित; केडीएमसी आयुक्तांचा मोठा दणका

तपासातून समोर आले आहे. तिघा पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतली आरोपी महिला काही ग्राहकांशी फोन वरून संपर्क साधत त्यांना हाय फ्रॉफाईल मुली शरीरसंबंधासाठी पुरवत होती. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्री तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, ठाण्या सारख्या सांस्कृतिक शहरात सेक्स रॅकेट वाढत असल्याचे आढळून येत आहे. पोलीस कारवाईच्या आकडेवारीनुसार मागील नऊ महिन्यात पन्नासहून अधिक मुलींची शरीरविक्रयच्या व्यवसायातून सुटका केली. तर गेल्या चार महिन्यात 18 दलालांना अटक करण्यात आली आहे.

अभिनयाच्या संधीने देहव्यापाराच्या जाळ्यात ओढ

ठाण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे अनेक प्रकार ठाणे पोलिसांनी आता पर्यंत उघड केले आहेत. त्यानंतर आता वेब सिरीज व फिल्म मध्ये काम देण्याच्या नावाखाली स्ट्रगलर अभिनेत्रींना या व्यवसायात ओढण्यात येत आहेत. नुकतीच वागळे स्टेट भागात एका हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एजंट महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील कळवा परिसरात पुन्हा एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी एका एजंट महिलेला अटक करीत तिच्या तावडीतून एक सहाय्यक दिगदर्शक व एका वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुटका करण्यात आली होती. या दोन्ही घटनांवरून ग्लॅमर दुनियेची भुरळ घालून तरुणींना या गलिच्छ व्यवसायात मोठ्या ओढण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Prostitution
KDMC News: केडीएमसी डोंबिवलीतील भाजपाचा तिसरा विजय...

पीडित महिकांची सुधारगृहात होते रवानगी

शरीरविक्रय व्यवसायावर छाप्यावेळी पोलीस फक्त दलालांवर कारवाई करतात. तर या व्यवसायात अडकलेल्या महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठवले जाते. तेथे या महिलांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना या गलिच्छ व्यवसायातून कायमचे बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक पीडित महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात मॉडेलिंग करणाऱ्या हाय प्रोफाइल मुलींपासून तर बांग्लादेशातून पळवून आणलेल्या गरीब मुलींचा देखील समावेश आहे.

अभिनयाच्या संधीने देहव्यापाराच्या जाळ्यात ओढ

ठाण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे अनेक प्रकार ठाणे पोलिसांनी आता पर्यंत उघड केले आहेत. त्यानंतर आता वेब सिरीज व फिल्म मध्ये काम देण्याच्या नावाखाली स्ट्रगलर अभिनेत्रींना या व्यवसायात ओढण्यात येत आहेत. नुकतीच वागळे स्टेट भागात एका हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एजंट महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील कळवा परिसरात पुन्हा एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी एका एजंट महिलेला अटक करीत तिच्या तावडीतून एक सहाय्यक दिगदर्शक व एका वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुटका करण्यात आली होती. या दोन्ही घटनांवरून ग्लॅमर दुनियेची भुरळ घालून तरुणींना या गलिच्छ व्यवसायात मोठ्या ओढण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news