पनवेलमध्ये पहिल्यांदाच तब्बल २५ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पनवेलमध्ये पहिल्यांदाच तब्बल २५ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पनवेल;पुढारी वृत्तसेवा – दसर्‍यानिमित्त पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथील मैदानात दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच पनवेलमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खास रामचरित्रावर आधारित रामलीलेचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले. यानंतर बुधवारी (दि. ५) रात्री तब्बल २५ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते. आज आपण रावण दहनासोबत आपल्यातील क्रोध, मोह, लोभ, वासना, गर्व, मत्सर, द्वेष, निराशा, आळस, अज्ञानाचे दहन करून विजयादशमी साजरी करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, मिडलक्लास सोसायटीचे अध्यक्ष राजू गुप्ते, मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमीत झुंजारराव आदी उपस्थित होते.

मिडलक्लास सोसायटी मैदानात यावर्षी साकारलेली रावणाची प्रतिमा २५ फूटाची असून, यामध्ये बांबूच्या काठ्या, पुठ्ठा, कागदाचा वापर करण्यात आला होता. तसेच रावणाची प्रतिकृती बनविण्यासाठी खास दिल्ली येथून दरवर्षी मुंबई येथे तीन महिने अगोदर कारागिर येऊन काम करतात. यंदा पनवेलमध्ये प्रथमच दिल्लीतील कारागिरांकडून दसर्‍यानिमित्त रावणाची प्रतिकृती बनवून घेतली होती. यावेळी रामलीला व रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच दसरासण साजरा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news