Dombivli cricket betting: डोंबिवलीत-भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर सट्टा

पाच सट्टेखोरांची धरपकड; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Cricket Betting
Cricket BettingPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: डोंबिवली जवळच्या खोणी गावातील लोढा पलावा गृहसंकलातल्या बिल्डींगमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर बेटिंग अर्थात सट्टा खेळवला जात असल्याचे कळताच क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने अचानक छापा टाकून पाच सट्टेखोरांची धरपकड केली.

कारवाई दरम्यान २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४ आणि ५ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

अमित लालचंद सिंगाणी (३७), कमल महेशकुमार दुलहानी (२८), विशाल जेठानंद वाधवानी (२८) सुनील आसनदास पोपटानी (२५) आणि पियुष रिजुमल चांदवाणी (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व मूळचे मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातल्या माधवनगर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय या रॅकेटमध्ये असलेले तरुण दादलानी आणि सौरभ चंद्राकर हे दोघेजण फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

Cricket Betting
Shepherd Families: आभाळ हेच छप्पर, माळरान हेच घर आणि मेंढरांचा कळप हाच संसार...

फ्लॅटमध्ये काही इसम भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० क्रिकेट सामन्यावर मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून सट्टा खेळत आणि खेळवत असल्याची माहिती क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, हवा. सचिन कदम, सतीश सोनावणे, सायबर एक्प्सर्ट पुष्कर झांट्ये यांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास पंचांसह सदर फ्लॅटवर छापा टाकला असता दरवाजा बंद असल्याचे दिसले.

Cricket Betting
Kalamboli Mhasoba Lake: कळंबोलीतील रोडपाली म्हसोबा तलावात हजारो मासे मृत; पाणी प्रदूषित झाल्याची नागरिकांची तक्रार

दरवाजा ठोठावल्यानंतर रमेश मिश्रा (३५) याने दरवाजा उघडला असून तो तेथे स्वयंपाक आणि साफसफाईचे काम करत असल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता तेथील बेडरूममध्ये पाच इसम लॅपटॉप आणि मोबाईलवर भारत/न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर बेटिंग अर्थात सट्टा खेळत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सट्टा खेळत आणि खेळवत असल्याची कबूली दिली. कारवाईदरम्यान पोलिसांनी या फ्लॅटमधून एकूण २ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये दोन लॅपटॉप, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोनचा समावेश आहे.

लाखो रुपयांचे व्यवहार

क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने अचानक छापा टाकून ही कारवाई करण्‍यात आली. यावेळी सायबर एक्स्पर्ट पुष्कर झांट्ये यांनी या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यामध्ये सट्टा पॅनल, व्हॉट्स ॲपवर, १५ विथड्रॉवल ग्रुप, १५ इश्यूज अशा विविध नावांचे ग्रुप आणि त्यामध्ये क्रिकेट बेटिंग संदर्भातील मेसेज, तसेच अशा बेटिंग ॲप्लिकेशन विविध नावांचे बँकिंग ॲप आढळून आले. या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news