Thane Crime : जादूटोणा प्रकरणी अटकेतील वडार याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

विनायक राऊत प्रकरणात बुवाबाजी करणारे रडारवर
Thane Crime News
जादूटोणा प्रकरणी अटकेतील वडार याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : ठाण्याच्या कापूरबावडी ठाण्याच्या जादूटोणा प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी आता पर्यंत फिरोज बाबा आणि राम वडार या दोघांना अटक केलेली असून पोलिसांनी फिरोज बाबाच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ करून घेत सोबतच सिधुदुर्ग येथून अटक केलेला आरोपी राम यल्लपा वडार यालाही न्यायालयात हजार केल्याने दोघा आरोपीना आता शनिवारी १८ जुलै रोजी हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणातील अटकेतील आरोपी फिरोज शेख उर्फ बाबा याला ठाणे पोलिसांनी दोन वेळा दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतल्यानंतर तिसऱ्यांदाही दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढ केली. फिरोज याचाच सहकारी राम वडार याला बुधवारी पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले.

Thane Crime News
Firoz Shaikh Arrested | कोलगावातील भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक

एकाच गुन्ह्यातील दोन आरोपी असल्याने दोघांची चौकशी करण्यात येणार आहे. या दोन्ही आरोपीना १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. आता फिरोज बाबा आणि राम वडार या दोघांना शनिवारी १८ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शनिवारी या दोघं आरोपीना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची शक्यता आहे.

Thane Crime News
Girija Raut allegations : गिरिजा राऊत छळ प्रकरण: भोंदू बाबा फिरोज शेखला पोलीस कोठडी

गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्या कुटुंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी विनायक राऊत यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने अर्ज फेटाळला. आता या अर्जावर मुख्य सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news