डोंबिवलीत रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे भुईसपाट

डोंबिवलीत रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे भुईसपाट
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 10/ई प्रभागातील रस्त्यात बाधीत होणार्‍या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.

संबंधित बातम्या 

केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्वामी समर्थ चौक ते साईबाबा मंदिर या रस्त्यामध्ये बाधित होणार्‍या एकूण 8 दुकानी गाळ्यांच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.

ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांनी पोलिस बंदोबस्तात 1 जेसीबी, 10 कामगारांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. या निष्कासनादरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news