Thane school renovation : ठाण्यातील सरकारी शाळांचा होणार कायापालट

जिल्हा नियोजनातून आता २० टक्के निधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Thane school renovation
एकनाथ शिंदेpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. शाळा दुरुस्ती, सुशोभीकरण आणि शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा नियोजनमधून २० टक्के निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांचा लवकरच कायापालट होणार आहे.

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन सुरु करणाऱ्या अभिजीत दिपकेंनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागांमधील शाळांकडे वळवला आहे. नीट पेपर फुटीप्रकरणी सरकारला देखील झुकावे लागले होते. शाळांच्या संदर्भात अभिजीत दिपकेंनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Thane school renovation
Marathi films prime time shows : मराठी चित्रपटांचा प्राईम शोसाठी संघर्ष सुरूच

ठाणे महापालिका क्षेत्रात तसेच ठाणे जिल्हातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणात असून अनेक शाळांमध्ये दुरावस्था आहे. अनेक शाळांची दुरुस्ती बाकी असून शाळांमध्ये असलेल्या गैरसोयींनमुळे पालकवर्गाचा सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देण्याचा कल वाढला आहे.

दिपके यांनी एकीकडे आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी, सुशोभीकरणासाठी तसेच या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना चांगले आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दोन्ही यंत्रणांना दिल्या आहेत. मुलांमध्ये शाळेप्रती ओढ निर्माण व्हावी यासाठी शाळा सुशोभिकरण सोबतच अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Thane school renovation
Mumbai momos food poisoning : मोमोज खाल्ल्याने १६ जणांना अन्नबाधा

यापूर्वी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून केवळ ५ टक्के निधी दिला जात होता. मात्र आता शाळांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी २० टक्के निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील शाळांचा संपूर्ण कायापालट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news