Mumbai momos food poisoning : मोमोज खाल्ल्याने १६ जणांना अन्नबाधा

कुर्ला भाभा रुग्णालयात १४ जण दाखल; दोघांवर ओपीडीत उपचार
Mumbai momos food poisoning
Mumbai momos food poisoningpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची प्रकृती व सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

Mumbai momos food poisoning
Maharashtra public libraries : तुटपुंज्या अनुदानातून खर्च भागविताना ग्रंथालयांच्या नाकीनऊ

दाखल १४ रुग्णांमध्ये कन्नू पाशा (३), अमिना पाशा (८), सुफियान पाशा (७), मिधत पाशा (१०), रिझमा पाशा (१३), शकीर अली (३१), सबिरा बानो (२६), कौसर शेख (१५), मुस्कान शेख (२४), प्रीती विश्वकर्मा (२२), रोशनी विश्वकर्मा (१८), नसरीन आलम शेख (१९), अबान इरफान खान (१४) आणि इरफान खान (४०) यांचा समावेश आहे. तर शुबी खान (१४) आणि शाफिया खान (१३) यांच्यावर ओपीडीत उपचार करण्यात आले.

सर्व रुग्णांमध्ये उलट्या आणि जुलाबाची लक्षणे आढळून आली असून, काहींना ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास झाला. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णांच्या प्रकृतीनुसार उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Mumbai momos food poisoning
School food safety inspection : शाळेतील मध्यान्ह भोजनाची एफडीएकडून तपासणी होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news