Eknath Shinde: ‘लोकशाही बचाव’चा ढोंगी नॅरेटिव्ह उघडा पाडा; राहुल गांधी आणि काँग्रेसवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

ठाण्यातील भाजपच्या आंदोलनात बोलताना विरोधकांकडून लोकशाही धोक्यात असल्याचा दावा आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर शिंदेंची टीका
Eknath Shinde
Eknath ShindePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. १९७५ मध्ये आणीबाणी होती; तेव्हा नेते तुरुंगात, आणि माध्यमांवर बंदी होती.

आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात आणि तरी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

ठाणे शहर भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात बोलताना शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्यावरून काँग्रेसला सुनावले.

“न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे, न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.राहुल गांधींच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरही शिंदेंनी पलटवार केला.

Eknath Shinde
Navi Mumbai Water Cut: पाण्याचा गैरवापर थांबविला तर कपातीची वेळ येणार नाही; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे गणेश नाईक यांचे आवाहन

“आरोप करा, पण पुरावे द्या. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, हिमाचलमध्ये काँग्रेसची सरकारे आली, तीही व्होट चोरीने आली का? ईव्हीएमवर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरी सिद्ध करावी,” असे आव्हान त्यांनी दिले.

मोदी सरकारने कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले, ८० कोटींना धान्य दिले, जनधन, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स, रोजगाराच्या योजना राबवल्या, असा दावा शिंदे यांनी केला. गरीबी २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आल्याचा जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भही त्यांनी दिला.

Eknath Shinde
Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका; त्यांना रोजगार, कौशल्य आणि संधी हव्या आहेत. मोदी हटावचा नॅरेटिव्ह चालणार नाही. ‘फेक नॅरेटिव्ह’ आणि गोबेल नीतीला जशास तसे उत्तर द्या. महाराष्ट्रात महायुतीचा आणि देशात एनडीएचा भगवा परचम फडकत राहील,” असे आवाहन शिंदे यांनी केले.

फडणवीस-शिंदे एकाच मंचावर

या पदयात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले. भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने ठाण्यात महायुतीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. दोन्‍ही नेत्‍यांनी काँग्रेससह विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आणि एकजुटीचे दर्शन घडवले.

२०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजपला दिलेला जनादेश काँग्रेससोबत सत्ता स्थापून बदलण्यात आला, खरी व्होटचोरी तेव्हा झाली. कोविड काळात मुंबई मनपामध्ये खुलेआम नोटचोरी करणारे आज व्होटचोरीची भाषा करू लागले आहेत.

एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.