Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Raj Thackeray Bodh Kirtan : बाळासाहेबांनी मला हातात लेखणी घेऊन लिहायला शिकवले, त्यांनी मला घडवले
Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut Raj Thackeray Bodh Kirtan : बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी ४० वर्षे काढली आहेत. 'सामना'चा संपादक असणे ही सोपी गोष्ट नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. माझा जीवनाचा प्रवास त्यांच्याबरोबर झाला आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत. शेवटी भाषण करणाऱ्याला जास्त मुद्दे मांडता येतात, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (३१ ऑक्टोबर) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संजय राऊतांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले की, सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंना संजय राऊत आवडत नव्हते. ते संजय राऊतांना शिव्या द्यायचे. बाळासाहेबांनी संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या दिल्या. मी दोनदा-तीनदा विचारल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊतांना 'लोकप्रभा'साठी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना असे काही प्रश्न विचारले ज्यावर बाळासाहेबांनी राऊतांना शिव्या दिल्या. दुसऱ्या दिवशी ती मुलाखत बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्यांसह छापून आली आणि त्यावरून संजय राऊत बाळासाहेबांना आवडू लागले. यानंतर संजय राऊतांची 'दैनिक सामना'च्या संपादकपदी निवड केली, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Vijay Mallya: ते तर देशभक्त; संजय राऊत विजय माल्ल्यांना 'फरार' म्हणण्यावर नाराज, नव्या पुस्तकात मोदींचेही कौतुक

"शेवटी भाषण करणाऱ्याला..."

आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी ४० वर्षे काढली आहेत. 'सामना'चा संपादक असणे ही सोपी गोष्ट नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. माझा जीवनाचा प्रवास त्यांच्याबरोबर झाला आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे एखाद्यावर चिडणे हा आशीर्वाद आहे. इतकी वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी माझ्यावर चिडणे हा माझा गौरव आहे. बाळासाहेबांनी मला हातात लेखणी घेऊन लिहायला शिकवले. त्यांनी मला घडवले, ते माझे शिक्षक आहेत. शेवटी भाषण करणाऱ्याला जास्त मुद्दे मांडता येतात."

Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut Supreme Court Apology: ‘एकदा नाही, मी दहादा माफी मागतो’; संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी का मागितली?

उपस्थिती आणि अनुपस्थिती महत्त्वाची नाही, पक्षाचा सहभाग महत्त्वाचा

ज्ञानेश कुमार यांच्या खुर्चीला धक्का देण्यासाठी दिल्लीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आता उद्धव ठाकरे यांनी मला इथे खास पाठवले आहे. मुंबईत आणि राज्यातात काही घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात थांबावे लागत आहे. आमचा पक्ष शिवसेना 'इंडिया' आघाडीसोबत ठाम आहे. पक्ष आणि विचारधारा म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सोबत आहोत. उपस्थिती आणि अनुपस्थिती महत्त्वाची नाही, तर पक्षाचा सहभाग महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्यासारखीच लढाई उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात लढवली आहे, असेही राऊत म्‍हणाले.

ज्ञानेश कुमारांना आता पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शनिवारी दिल्लीत प्रतीकात्मक महाभियोग कार्यक्रम झाला आहे. जनतेच्या वतीने काल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले आहे. यामुळे त्यांनी पदावर राहू नये. प्रतीकात्मक संसदेमध्ये एकमताने ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीचा ठराव मंजूर झाला. सरकार आणि सरकारने नेमलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना धक्का देण्यासाठी आज भारतातून लोक येत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या खुर्चीला धक्का देण्यासाठी रामलीला मैदानावर रॅली होईल, असेही राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut : "शेवटी भाषण करणाऱ्याला...": 'बोध कीर्तन' प्रकाशनावेळी राज ठाकरेंच्या 'टोलेबाजी'वर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah: गृहमंत्र्यांच्या तोंडी ज्ञानेश कुमारांची भाषा.... आता 'प्रकट' होण्यावरून संजय राऊतांचे चिमटे

देशात रावणलीला सुरू आहे

भाजपच्या टीकेला अर्थ राहिला नाही. देशात रावणलीला सुरू आहे, ती खतम करण्यासाठी आम्ही रामलीला करायचे ठरवले आहे. रावणाने सुद्धा या सरकारसारखे केले नाही. भाजपने रामायण नीट वाचले पाहिजे. राम आणि रामराज्य भाजपने समजून घेतले पाहिजे. रावणराज्य त्यांनी निर्माण केले आहे, ते संपवण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत. आमची सेना रामाच्या प्रेरणेतून तयार झाली आहे, असेही राऊत म्हणाले.

लाखो लोक दिल्लीत येऊन खरेदी करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे व्यापारी आहेत. त्यांचे नुकसान होत आहे. देशातून येणारे लाखो लोक दिल्लीत येऊन खरेदी करतील, राहुल गांधींनी याबाबतीत आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी व्यापाऱ्यांचा विचार केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.