Electric bus pass : ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू

महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत
Electric bus pass
ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरूPudhari File Photo
Published on
Updated on

ठाणे ः ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणार्‍या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Electric bus pass
Thane News : निवृत्त धारकांच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांत निकाली काढण्याचे आदेश

पास योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये

  • उपलब्धता : 9 मीटर ई-बस, 12 मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील.

  • (ई-शिवनेरी बससेवा वगळून)

  • मासिक पास : (30 दिवस): 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 30 दिवसांसाठी पास दिला जाईल.

  • त्रैमासिक पास : (90 दिवस) : 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 90 दिवसांचा पास उपलब्ध होईल.

  • सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.

  • निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक 100% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे.

Electric bus pass
PAT exam : आजपासून राज्यभरातील शाळांत पॅट परीक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news