PAT exam : आजपासून राज्यभरातील शाळांत पॅट परीक्षा

प्रश्नपत्रिकांच्या उपलब्धतेवर यंदाही गोंधळाच्या तक्रारी
PAT exam
आजपासून राज्यभरातील शाळांत पॅट परीक्षाPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यंदाच्या संकलित मूल्यमापन चाचणी-1 (पॅट) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या चाचण्या 10, 11 व 13 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

गेल्या शैक्षणिक वर्षी पॅट परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याच्या नियोजनावरून एससीईआरटी वर प्रचंड टीका झाली होती. शाळांचा अधिकार थेट परिषदेने घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदा तो अनुभव लक्षात घेऊन शाळांना सहामाही परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

पॅट परीक्षा ही दहावी-बारावीप्रमाणे उच्चस्तरीय नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि अध्ययनातील अडथळे ओळखण्यासाठीची साधने असल्याचे स्पष्टीकरण एससीईआरटीने दिले आहे. या चाचणीच्या प्रश्नपत्रिका 5 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरावर वितरित केल्या जाणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि तालुका समन्वयक यांच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिका थेट शाळांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे म्हटले होते. मात्र अनेक शाळांत मिळाल्या नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.

PAT exam
CM Fadnavis | स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय, अंमलबजावणी महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ : मुख्यमंत्री

राज्यभर ही परीक्षा चालू होणार असली तरी यावर्षीही प्रश्नपत्रिकांच्या उपलब्धतेवर गोंधळ आहे. अनेक शाळांना अद्याप प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत, तर काही ठिकाणी अपुर्‍या प्रमाणात मिळाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

PAT exam
11th admission : अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीत 6 हजार अर्ज
  • दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 60 मिनिटांची, तिसरी ते सहावीपर्यंत 90 मिनिटांची तर सातवी-आठवीसाठी 120 मिनिटांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयात लेखी आणि मौखिक दोन्ही घटक असतील. गुणपद्धतीनुसार दुसरीसाठी 30, तिसरी-चौथीसाठी 40, पाचवी-सहावीकरिता 50 आणि सातवी-आठवीकरिता 60 गुणांची चाचणी होणार आहे. पहिली भाषा (मराठी किंवा अन्य माध्यमानुसार), गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांमध्येच पॅट घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news