Maharashtra State Drama Competition: राज्यात अव्वल ठरलेल्या डोंबिवलीतील नाट्यसंघांचा भव्य गौरव सोहळा

महाराष्ट्र राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार; ‘दगडी भिंत’ व ‘लिझलस सिक्रेट’ची चमकदार कामगिरी
Maharashtra State Drama Competition
Maharashtra State Drama CompetitionPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : फ्रेंड्स लायब्ररी आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा व 22 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या डोंबिवलीकर संघांचा शनिवारी विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये श्रीकला संस्कार न्यास संस्थेच्या संपदा जोगळेकर कुळकर्णी लिखित दगडी भिंत या नाटकाचा तसेच गुरूकुल द डे स्कूल शाळेच्या लिझलस सिक्रेट या बालनाट्याचा समावेश होता.

Maharashtra State Drama Competition
Tarapur Gas Leak: तारापूर MIDC मध्ये वायुगळती; १८ कामगारांना वायूबाधा

माधव जोशी, ॲड. सुहास तेलंग, डॉ. संदीप आणि प्रा. मंजिरी घरत यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी गुरुकुल द डे स्कूलचे संस्थापक अजित करकरे यांनी दोन्ही नाटकांविषयी आपले विचार व्यक्त केले. दगडी भिंत नाटकाचे दिग्दर्शक तथा संगीत दिग्दर्शक आशुतोष वाघमारे यांनी आपल्या या यशाचे श्रेय संपूर्ण कल्याण-डोंबिवलीकर प्रेक्षकांसह नाट्यकर्मींना दिले. दगडी भिंत नाटकातील

Maharashtra State Drama Competition
Nalasopara Beach Drowning: नालासोपारात समुद्रात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

वैयक्तिक पारितोषिके पटकावणाऱ्या सर्वश्री आशुतोष वाघमारे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन - प्रथम), वृषांक कवठेकर (सर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रथम), विनोद राठोड (सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - प्रथम), उल्लेश खंदारे (सर्वोत्कृष्ट रंगभूषा - प्रथम), श्रुती गणपुले, निखिला इनामदार (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रौप्यपदक) यांच्यासह इतर कलावंतांचा सत्कार केला.

Maharashtra State Drama Competition
Senior Citizen Safety: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांचा पुढाकार; ‘पोलीस दादा’ बनले आधारस्तंभ

नाट्यरसिकांकडून विजेत्यांचे कौतुक

22 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत गुरूकुल द डे स्कूलच्या लिझलस सिक्रेट या बालनाट्यातील वृषांक कवठेकर (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम), आशुतोष वाघमारे (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - द्वितीय), विनोद राठोड (सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - तृतीय), दिया गीते (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रौप्यपदक), अर्णव कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट अभिनेता - रौप्यपदक) यांच्यासह सर्व सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news