Nalasopara Beach Drowning: नालासोपारात समुद्रात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

फुटबॉल खेळताना नवापूर बीचवर घडली घटना; पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले
Drowning
DrowningPudhari
Published on
Updated on

नालासोपारा : नवापूर बीच येथे दोन अल्पवयीन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दोन मुले फुटबॉल खेळण्यासाठी गेली होती. या दरम्यान दोन्ही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Drowning
Raigad Gram Panchayat Election: रायगडात 127 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी; 30 सरपंच, 170 सदस्यांसाठी मतदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंथन रविंद्र धोत्रे (16) व त्याचा मित्र श्लोक चिंदरकर (16) हे आपल्या इतर मित्रांसोबत नवापूर बीचवर फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान खेळताना दोघेही समुद्राच्या पाण्यात गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाले.

Drowning
Murud Tourism Summer: आल्हाददायक हवामानामुळे मुरुडला पर्यटकांची पसंती; समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे फुलली

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्यात आला, मात्र दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news