

डोंबिवली :इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए फायनल मे २०२६ परीक्षेत डोंबिवलीतील सोहन अनिल मांजरेकर याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ६० पैकी ४७३ गुण मिळवत त्याने ७८.८३ टक्के गुणांसह ऑल इंडिया रँक ३ मिळवली आहे. एकीकडे गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानंतर सोहनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीए फायनल ही देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक आहे. दोन्ही गट एकत्र देणाऱ्या २३,७६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३,३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पासिंग टक्केवारी १४.०७ टक्के इतकी कमी आहे.
या परीक्षेत पतियाळाच्या नूर सिंगलाने ४९ गुणांसह ८३.१७ टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला, तर हावड्याच्या रितीज सराफने ४७५ गुणांसह ७९.१७ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून टॉप ३ मध्ये स्थान मिळवणारा सोहन हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. २ ते १२ मे दरम्यान झालेल्या या परीक्षेत एकूण ७ हजार ९३१ विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटन्ट म्हणून पात्र ठरले.