Dombivli Crime | डोंबिवलीत संतापजनक प्रकार; शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी

मनसेच्या गदारोळानंतर मुलाला अटक : मानपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
Dombivli Teacher Harassment Case
Dombivli Teacher Harassment Case Pudhari
Published on
Updated on

Dombivli Teacher Harassment Case

डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या सांगावमध्ये शाळेतील विश्वस्ताच्या स्त्रीलंपट मुलाचा कारनामा मनसे सैनिकांनी चव्हाट्यावर आणला आहे. याच शाळेतील शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला मनसैनिकांनी जोरदार तडाखा दिला आहे. मानपाडा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या सांगाव भागात एका शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाने आपल्या वडिलांच्या शाळेतील शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि काही अश्लील व्हिडिओ पाठवले. मेसेजच्या माध्यमातून या मुलाने शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा त्रास वाढू लागताच संबंधित पीडित शिक्षिकेने यासंदर्भात तक्रार करताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शाळेत जाऊन त्या मुलाला ताब्यात देण्याची जोरदार मागणी केली. एक तास हा गोंधळ शाळेच्या आवारात गुरूवारी (दि.२६) दुपारपासून सुरू होता.

Dombivli Teacher Harassment Case
Dombivli Crime | पगार थकला अन् चालक भडकला: डंपरने मालकाच्या कारला १० ते १५ फूट फरफटत नेले

विशेष म्हणजे एक सेवानिवृत्त प्राध्यापक ही शाळा चालवितो. या प्राध्यापकाच्या विश्वस्त मुलाने हा प्रकार शाळेतील शिक्षिकेसोबत केला आहे. शाळा मालक आणि चालक असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाने आपला मुलगा या प्रकरणात दोषी आढळला. तर कायद्याप्रमाणे पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका घेऊन आपल्या मुलाला अधिक चौकशीसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्व भागातील सांगाव भागात एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेचे विश्वस्त एक सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. शाळेचे चालक असलेल्या विश्वस्ताच्या मुलाचा शाळेशी नियमित संबंध असतो. शाळेतील एका शिक्षिकेशी विश्वस्ताच्या मुलाने लगट करून तिला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.

Dombivli Teacher Harassment Case
Dombivli Crime | दिवसा मिस्त्री काम...अन् रात्री दुचाक्यांच्या चोऱ्या, पतीचे कारनामे ऐकून पत्नीही चक्रावली!

मात्र, शिक्षिकेने विश्वस्ताच्या मुलाला प्रतिसाद देणे बंद केले आणि असे प्रकार करण्यापासून रोखले. पण तरीही विश्वस्ताचा मुलगा सतत त्रास देऊ लागल्याने या प्रकाराने त्रस्त झालेल्या शिक्षिकेने मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राहूल कामत, विधानसभा प्रमुख अरूण जांभळे, जिल्हाध्यक्षा कोमल पाटील यांची भेट घेतली. शाळेच्या विश्वस्तांच्या मुलाकडून होत असलेल्या त्रासाबाबतची माहिती दिली.

गुरूवारी मनसेचे पदाधिकारी सांगाव येथील त्या शाळेत पोहोचले. त्यांनी त्या मुलाला ताब्यात देण्याची मागणी केली. मनसेच्या पदाधिकारी आणि राजसैनिकांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी शाळा परिसर दणाणून सोडला. या सगळ्या प्रकाराने शाळेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसेच्या महिला आक्रमक भूमिका घेतली होती.

Dombivli Teacher Harassment Case
Dombivli Crime | डोंबिवलीत अल्पवयीन तरूणाच्या लग्नाचा डाव उधळला: पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल

या सर्व प्रकाराची माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलिस पथकासह शाळेत येऊन घडल्या घटनेची माहिती घेतली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या चर्चेतून शाळा विश्वस्तांनी आपल्या मुलाचा ताबा पोलिसांना दिला. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news