Dombivli Crime | पगार थकला अन् चालक भडकला: डंपरने मालकाच्या कारला १० ते १५ फूट फरफटत नेले

डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल
Dombivli Dumper Drags Car
Dombivli Dumper Drags Car Pudhari
Published on
Updated on

Dombivli Dumper Drags Car

डोंबिवली : वेतन थकित राहिल्यामुळे संतापलेल्या चालकाने वचपा काढण्यासाठी चक्क ठेकेदार मालकाची कार डम्परने तब्बल १० ते १५ फूट फरफटत नेत नुकसान केल्याची धक्कादायक घटना पश्चिम डोंबिवलीतील राजूनगर परिसरात मंगळवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत टिटवाळा ते मोठागाव-माणकोली बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत विविध ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात कामगार व वाहन चालक काम करत आहेत.

Dombivli Dumper Drags Car
Dombivli Job Scam: नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघड

मात्र, गेल्या महिनाभरापासून काही कामगारांचे वेतन थकित असल्याची तक्रार आहे. वारंवार मागणी करूनही वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी या मार्गावर माती वाहतूक करणारा अवजड डंपर जात असताना संबंधित ठेकेदाराची कार रस्त्याच्या मध्यभागी उभी होती.

मालक कामाच्या पाहणीसाठी बाजूला गेला असतानाच चालकाच्या नजरेस ही कार पडली. वेतन न मिळाल्याच्या संतापातून चालकाने डंपरने कारला पुढून ढकलत अंदाजे १० ते १५ फूट फरफटत नेले. त्यानंतर ही कार समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या डम्परला धडकून अडकली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Dombivli Dumper Drags Car
Kalyan Dombivli | कल्याण-डोंबिवलीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा: मध्य पुर्वेतील तणावाचा स्थानिक पातळीवर परिणाम!

सुदैवाने कारमध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. घटना घडल्यानंतर डम्परच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार काही कामगारांनी मोबाईलवर चित्रीत केला असून व्हिडीओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

देयके मंजुरीतील विलंबामुळे ठेकेदार आर्थिक तणावात

दरम्यान, प्राधिकरणाकडून देयके मंजूर होण्यात विलंब होत असल्याने ठेकेदारांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर होत असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news