Dombivli auto rickshaw fare hike : एक रुपया भाडेवाढ कागदावरच; मीटर पुनर्मापन न झाल्याने रिक्षाचालकांचे हाल

गरीब रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे न्यायाची मागणी
Dombivli auto rickshaw fare hike
Dombivli auto rickshaw fare hikepudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने एक सप्टेंबरपासून ऑटोरिक्षासाठी एक रुपया भाडेवाढ जाहीर केली असली तरी ही वाढ केवळ कागदावरच राहिली आहे. या निर्णयाला जवळपास एक महिना उलटूनही कल्याण-डोंबिवली परिसरात एकाही रिक्षाचालकाच्या मापक यंत्राचे पुनर्मापन झालेले नाही. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गरीब रिक्षाचालकांचे दररोज आर्थिक नुकसान होत असून या गंभीर विषयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी भाजपा प्रणित रिक्षा चालक-मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात दत्ता माळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त, ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे सविस्तर निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मापक यंत्राचे पुनर्मापन न होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मापक यंत्र तयार करणाऱ्या कंपन्यांचा हलगर्जीपणा आहे.

Dombivli auto rickshaw fare hike
Dombivli liquor smuggling : दिव-दमणची दारू गुजरातला तस्करी करण्याचा डाव उधळला

एकीकडे ज्या काही मापक यंत्र उत्पादक कंपन्या आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत अधिकृत परवानाधारक दुरुस्ती करणाऱ्यांकडे पुनर्मापनासाठी लागणारा कार्यवाही संच उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे दुरुस्ती करणारेही हतबल झाले आहेत. तर दुसरीकडे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा गलथान कारभारही या प्रकरणात समोर आला आहे.

शासनाने भाडेवाढ जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासण्यासाठी कार्यालयाने कोणतीही विशेष तपासणी मोहीम राबविलेली नाही. परिणामी प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्यावरून वादावादीचे प्रकार घडत आहेत. मापक यंत्राचे पुनर्मापन नसल्यामुळे चालकांना जुन्याच दराने भाडे घ्यावे लागत आहे.

Dombivli auto rickshaw fare hike
Railway ID proof mandatory : रेल्वे प्रवासात नऊपैकी एक ओळखपत्र बंधनकारक

इंधनाचे दर आणि महागाई वाढलेली असताना ही भाडेवाढ केवळ कागदावरच राहिल्याने गरीब रिक्षाचालकांचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वीचा अनुभव असा आहे की हे काम एक ते दोन वर्षे असेच रखडत राहते.

प्रवाशांमध्ये जनजागृती करावी...

  • या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ठोस मागण्या करण्‍यात आल्या आहेत. सर्व मापक यंत्र उत्पादक कंपन्यांनी तातडीने कल्याण-डोंबिवलीतील सर्व अधिकृत परवानाधारक दुरुस्ती करणाऱ्यांकडे पुनर्मापनासाठी लागणारा कार्यवाही संच आणि साहित्याचा साठा उपलब्ध करून द्यावा.

  • कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तातडीने लक्ष घालून मापक यंत्र पुनर्मापनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करावी. तसेच जोपर्यंत पुनर्मापन होत नाही, तोपर्यंत परिवहन कार्यालयाने रिक्षाचालकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये. याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news