Railway ID proof mandatory : रेल्वे प्रवासात नऊपैकी एक ओळखपत्र बंधनकारक

मध्य रेल्वेची आजपासून मोहीम; आरक्षित तिकिटावर ओळखपत्र नसल्यास प्रवाशांना दंड
Railway ID proof mandatory
Railway ID proof mandatorypudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर ‘आरक्षित’ केलेल्या तिकिटांवर किंवा ‘ई-पास’वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज गुरुवारपासून (दि. १) शासनमान्य मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे. रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्यासाठी मध्य रेल्वेकडून १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

या अंतर्गत एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. एकानेही ओळखपत्र सादर न केल्यास ‘पीएनआर’वरील सर्व प्रवाशांना दंड आकारला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

Railway ID proof mandatory
Mumbai News : पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने चार वर्षांपासून जतन करून ठेवला मृतदेह

अनेक वेळा प्रवासात रेल्वेचे तिकीट तपासणीस हे सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सत्यता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले शासनमान्य मूळ ओळखपत्र प्रवाशाकडे सोबत आहेत, असे गृहीत धरत असतात; मात्र यापुढे त्याची कठोर तपासणी केली जाणार आहे. प्राधान्याने आरक्षित तिकीट काढले त्याचे मूळ ओळखपत्र तपासले जाणार आहे. त्याच्याकडे मूळ ओळखपत्र नसल्यास तिकिटावरील एका तरी प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

प्रवासामध्ये एकानेही मूळ ओळखपत्र सादर न केल्यास सर्व प्रवाशांना विनातिकीट मानले जाणार आहे. तसेच, ई-पास/पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा शासनमान्य मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ई-पास/पीटीओच्या बदल्यात प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट/पास मिळवला आहे याची खात्री करून घ्यावी, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Railway ID proof mandatory
Mumbai bribery case : २५ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच

केवळ हीच ओळखपत्रे दाखवावी लागणार

  • आधार कार्ड

  • मतदार ओळखपत्र

  • पॅन कार्ड

  • ड्रायव्हिंग लायसन्स

  • पासपोर्ट

  • बँक पासबुक

  • विद्यार्थी ओळखपत्र

  • केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र

  • दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले यूडीआयडी कार्ड

येथे होणार तपासणी : मध्य रेल्वेचे महाराष्ट्रात पाच प्रमुख विभाग आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर येथून राज्यभर धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या आरक्षित रेल्वेगाड्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

तिकीट आरक्षण सुविधेचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासचा फसवणुकीने होणारा वापर थांबवणे आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मध्य रेल्वेकडून महिनाभर ही मोहीम राबविली जाणार आहे.

डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news