Dombivli liquor smuggling : दिव-दमणची दारू गुजरातला तस्करी करण्याचा डाव उधळला

तिघा तस्करांसह ७.२२ लाखांची दारू जप्त
Dombivli liquor smuggling
Dombivli liquor smugglingpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : ठाणे पोलीस आयुक्तालयातील अवैध दारू तस्करीला अंकुश लावण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मोठी धडक कारवाई करत दिव आणि दमण येथील प्रतिबंधित दारूचा साठा गुजरातला तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या खंबाळपाड्यातील शेलार मैदानाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून तब्बल ७ लाख २२ हजार ७०० रुपये किंमतीच्या ७ हजार ९२० सीलबंद दारूच्या बाटल्या आणि ९९ प्लास्टिकचे पाईप जप्त केले आहेत. या कारवाईत तिघा तस्करांना अटक करण्यात आली आहे.

या छाप्यादरम्यान क्राईम ब्रँचने शेडमध्ये चोरीछुपे सुरू असलेल्या कांडाचा पर्दाफाश केला. कुणाला संशय येऊ नये म्हणून हे तिघे तस्कर दिव/दमण येथून वेगवेगळ्या कंपनीच्या सीलबंद दारूच्या बाटल्या चोरट्या मार्गाने शेडमध्ये आणायचे. या बाटल्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये भरून पाईपचे तोंड टेपने बंद करून त्या गुजरात राज्यातील राजकोट येथे विक्रीकरिता पाठविण्याच्या तयारीत होते. पथकाने छाप्यादरम्यान डोंबिवली जवळच्या देसलेपाड्यातील नवनीत नगरमध्ये असलेल्या सोसायटीत राहणारे हिरेन भानुशाली (३०), मनिष धुकरे (४०) आणि विपुल शुक्ला (२२) या तिघांना ताब्यात घेतले.

Dombivli liquor smuggling
Nasha Mukt Bharat 2029 : देशात बारा वर्षात १ कोटी १९ लाख किलो अमली पदार्थ जप्त

या त्रिकुटाकडून वेगवेगळ्या कंपनीच्या मापाच्या आणि किंमतीच्या एकूण ७ हजार ९२० वीस सीलबंद दारूच्या बाटल्यांचा अवैध साठा व ९९ प्लास्टिकचे पाईप असा एकूण ७ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी तिघा तस्करांविरूद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयात अवैधपणे दारूची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्याचे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गणेश दळवी, सपोनि सर्जेराव पाटील, आदींच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा शोध सुरू केला होता.

Dombivli liquor smuggling
Railway ID proof mandatory : रेल्वे प्रवासात नऊपैकी एक ओळखपत्र बंधनकारक

खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी या पथकाने खंबाळपाड्यातील शेलार मैदानाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news