Kalyan Dombivli | कल्याण-डोंबिवलीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा: मध्य पुर्वेतील तणावाचा स्थानिक पातळीवर परिणाम!

सिलेंडरचा पुरवठा कमी होण्याची गृहिणींमध्ये भिती, प्रशासनाकडून गॅस वितरण व्यवस्थित होत असल्याचा दावा
Kalyan Dombivli | कल्याण-डोंबिवलीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा: मध्य पुर्वेतील तणावाचा स्थानिक पातळीवर परिणाम!
Kalyan Dombivli | कल्याण-डोंबिवलीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा: मध्य पुर्वेतील तणावाचा स्थानिक पातळीवर परिणाम!
Published on
Updated on

डोंबिवली : अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटताना दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीत घरगुती गॅससाठी एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी सिग्नलजवळ असलेल्या गुरूकृपा भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची भली मोठी  रांग लागलेली सोमवारी निर्दशनास आली.  

  इराण-इस्त्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सर्वत्र गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. ऑनलाईन बुकिंगमध्ये अडचणी, ओटीपी न मिळणे आणि घरपोच सेवा विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना स्वतःहून गोडाऊनवर जावे लागत आहे. गॅस उपलब्ध असूनही वितरणातील समस्यांमुळे ग्राहकांना भर उन्हात तासन् तास रांगेत उभे रहावे लागत आहे. अनेक ग्राहकांना बुकिंग केल्यानंतर ओटीपी (OTP) न मिळाल्याने घरपोच सिलेंडर मिळत नाही. घरगुती कामांवर परिणाम झाला असून हॉटेल व्यावसायिकही हैराण झाले आहेत. इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता असली तरी प्रशासनाकडून मात्र गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र सिलेंडरची घरपोच सेवा बंद झाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.

 या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या भीतीने ग्राहकांनी मोठ्या संख्येने एजन्सीकडे धाव घेतली आहे. परिणामी एजन्सीच्या बाहेर तब्बल पाचशे मीटरपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागल्या असून परिसरात गर्दीचे चित्र दिसून येत आहे. घरात लागणारा गॅस सिलेंडरचा पुरवठा भविष्यात कमी होण्याची भिती प्रामुख्याने गृहिणींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण अतिरिक्त सिलेंडर घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे अचानक मागणी वाढल्याने वितरण व्यवस्थेवर ताण आला आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा न करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचेही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news