Dombivli Job Scam: नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघड

रेल्वेत नोकरी व कंत्राटाचे आमिष, गुंगीचे औषध देत शोषण; 10 लाखांची फसवणूक, आरोपी फरार
Friend Abuse Assault
Friend Abuse AssaultPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : रेल्वेमध्ये नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.

रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका गरजू महिलेला घरी बोलावून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. फोटो आणि व्हिडिओ करून ब्लॅकमेल तर केलेच, शिवाय पीडित महिलेला हा प्रकार कुणाला सांगितला, तर व्हीडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार होणाऱ्या या प्रकारास कंटाळून पीडितेेने आपल्या पतीसह रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकस तपास सुरू केला आहे.

Friend Abuse Assault
Mumbai Sea Pollution: समुद्रात सांडपाणी सोडल्याने किनाऱ्यावरील प्रदूषण वाढले; जलचरांवर गंभीर संकट

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हा तिला धमक्या देऊ न तिच्यावर गेल्या काही वर्षांपासून अत्याचार करत होता. हे सगळे करूनही तो थांबला नाही, तर त्याने रेल्वेत कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली पीडित महिलेच्या पतीकडून 10 लाख रुपये उकळले आहेत. आपली फसवणूक होत असल्याची पीडित महिलेच्या पतीला खात्री पटली होती. पत्नीमुळे पती या आरोपीच्या संपर्कात आला होता. रेल्वेत कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली 10 लाख रुपये उकळल्याचे पतीने पत्नीला सांगितले. हे ऐकून पत्नीनेही पतीला आपल्याबद्दल घडलेल्या प्रकारांची माहिती दिली. या दाम्पत्याने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Friend Abuse Assault
Mumbai Water Shortage: मुंबईतील पाणीटंचाई अजून दशकभर कायम? महापालिकेचा इशारा

न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

8 मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. अटक झाली नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन आरोपीने कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्याच्या जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती फिर्यादीचे वकील ॲड. महेश शिवदास यांनी दिली. त्यामुळे आरोपीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Friend Abuse Assault
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेचा नवा आयुक्त कोण? चर्चांना उधाण

आरोपी अद्याप फरार...

आरोपी आता फरार आहे. त्याला अटक झालेली नाही. त्याचा मोबाईल ट्रेस का केला जात नाही? असा सवाल पीडित महिलेने उपस्थित केला आहे. हा तपास महिला अधिकाऱ्याकडे द्यावा. आरोपीची कसून तपासणी करावी. त्याचा लॉपटॉप व सर्व मोबाईलवरील डेटा जमा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करून सर्वांना न्याय द्यावा, अशीही मागणी पीडित महिलेने तिच्या अर्जात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news