Dombivli electricity theft : कल्याणच्या ग्रामीण भागात वीजचोरांचा सुळसुळाट

सहा जणांवर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई
Dombivli electricity theft
Dombivli electricity theftpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याणच्या ग्रामीण भागात वीज चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून वीज चोरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा वीज चोरांविरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणच्या भरारी पथकाने कल्याण-मलंगगड रोडवरील नांदिवली आणि कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी परिसरातील गृहसंकुलांमध्ये अचानक वीज मीटर तपासणी मोहीम राबवली होती. या तपासणी मोहिमेदरम्यान काही घरांमध्ये वीज मीटरची जोडणी नसताना सोसायटीच्या वीज मीटरला वळसा देऊन तसेच थेट रस्त्यावरील विजेच्या खांबावरून तार टाकून चोरून वीज वापर केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे तीन वीज वापरकर्ते आणि त्यांचे घरमालक अशा एकूण सहा जणांविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Dombivli electricity theft
Thane flower prices : पितृपक्षात फुलांना मागणी घटली, दरही घसरले

कल्याण पूर्वेतील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र मेंढे हे आपल्या पथकासह वीज चोरी शोध मोहिमेसाठी आपल्या पथकासह मलंगगड परिसरातील नांदिवली येथील महेक रेसिडेन्सीमधील प्रकाश डी. वाधवा यांच्या एफ विंगमधील सदनिकेत पोहचले होते. तेथे वाधवा यांच्यावतीने ग्राहक प्रतिनिधी म्हणून वापरकर्ते आरती शक्तिनाथ सिंग उपस्थित होत्या.

महावितरणच्या तपासणी पथकाने वाधवा यांच्या सदनिकेच्या वीज मीटरची तपासणी केल्यावर वीज मीटरला वळसा देऊन एक तार भिंतीमध्ये गुंतवून त्या आधारे घरात थेट चोरून वीज पुरवठा घेतला गेला असल्याचे पाहणी पथकाच्या निदर्शनास आले. ही बाब वीज ग्राहक आरती सिंग यांना दाखविण्यात आली. त्यामुळे सदनिका मालक प्रकाश वाधवा यांच्या घराचे वापरकर्ते आरती सिंग यांनी २९ जुलै २०२४ ते २९ जुलै २०२५ या वर्षभराच्या कालावधीत १ हजार ८० वीज युनिटची वीज चोरी केली.

Dombivli electricity theft
Wada Palghar drought : पालघरात भाताच्या शेतात पाण्याअभावी पडल्या भेगा

महावितरणचे १७ हजार ८८० रूपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच ही वापराची रक्कम महावितरणकडे भरणा केली नाही म्हणून महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र मेंढे यांनी सदनिका मालक प्रकाश वाधवा, वापरकर्ते आरती सिंग यांच्या विरूध्द विद्युत कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रियंका महाजन, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश कोळी, समाधान देसले आणि पंच सहभागी झाले होते.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र मेंढे यांच्या भरारी पथकाने कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी येथील महेश बाळकृष्ण खोरे यांच्या मालकीच्या सीताबाई रामचंद्र नगरमधील चाळीत वीज मीटर तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनुश शामजी यादव राहत असलेल्या घराची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या घरात रस्त्यावरील विजेच्या खांबावरून तारेने चोरून वीज पुरवठा घेतला असल्याचे आणि या खोलीला वीज मीटर नसल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. वीज चोरी करणे हा गु्न्हा आहे हे माहिती असुनही महेश खोरे आणि भाडेकरू राम शामजी यादव यांनी डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १९४ युनिटची वीज चोरी करून महावितरणचे ७ हजार ५२० रूपयाचे आर्थिक नुकसान केले आहे.

याच चाळीतील रहिवासी अनिल सुंदरलाल पासवान यांच्या खोलीची वीज मीटर तपासणी पथकाने केली. त्यांच्या खोलीला वीज मीटर नव्हता. अनिल हेही वीजेच्या खांबावरून चोरून वीज वापरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ११ हजार ७०५ रूपयांची वीज चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही भाडेकरूंनी नियमित कळवुनही थकित वीज देयक रकमेचा भरणा केला नाही म्हणून महावितरणने त्यांच्या विरूध्द विद्युत कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news