Dombivli Crime : डोंबिवलीत माणुसकीला काळिमा! भटक्या कुत्र्याची मारहाण करून हत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

सोसायटीतील दोघांसह सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल, मानपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू
stray dog
stray dogpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या जिमखाना रोडवर सांगर्ली परिसरातील सुरेश कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करून त्याला ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुक्या प्राण्याला पकडून बेदम झोडपल्यानंतर त्याच्या गळ्यात दोरी बांधून गळफास देऊन हत्या केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

माहितीनुसार, सुरेश कॉम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात असलेल्या एका भटक्या कुत्र्याला सोसायटीतील काही रहिवाशांनी पकडले. त्याला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला गळफास देऊन त्याला ठार करण्यात आले. या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ जागरूक रहिवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

stray dog
Kalyan Dombivli Water Supply: रोज ३७५ दशलक्ष लिटर पाणी मिळते, मग नळाला पाणी का नाही? कल्याण-डोंबिवलीच्या जलव्यवस्थेवर मोठा सवाल

या घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्या हिर राजपूत यांनी तातडीने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुत्र्याला निर्दयीपणे ठार मारणाऱ्या सोसायटीतील दोन रहिवासी ओमकार केंद्रे आणि तुषार केंद्रे तसेच सोसायटीचा सुरक्षा रक्षक प्रकाश या तिघांच्या विरोधात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

stray dog
Thane Circular Metro: ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोविरोधात ५०० हून अधिक नागरिकांचा मूक मोर्चा; वृक्षतोडीला विरोध

मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून व्हायरल झालेल्या व्हिडिओचीही पडताळणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news