Dombivli Chhath Puja Accident : छठ महापर्वाच्या आनंदावर शोककळा

दावडी तलावात कुटुंबासोबत उतरलेला २५ वर्षीय तरूण बुडाला
Dombivli Chhath Puja Accident
Dombivli Chhath Puja Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत छठ महापर्वाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळील दावडी परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. छठपूजेच्या निमित्ताने कुटुंबासोबत तलावात उतरलेला २५ वर्षीय जुगनू कश्यप हा तरूण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जिथे काही वेळापूर्वी भजन-कीर्तन, छठ गीतं आणि भक्तीचा उत्साह होता, तिथे अचानक आक्रोश आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुगनू हा आपल्या कुटुंबासोबत छठपूजेसाठी दावडी येथील तलावावर आला होता. पूजा आटोपल्यानंतर तो कुटुंबासोबत तलावात उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. कुटुंबीयांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी जुगनूला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोली यामुळे सर्वांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

Dombivli Chhath Puja Accident
Yuva Connect 2026 Porvorim Goa |युवक नोकरी देणारा असावा, मागणारा नव्हे: मंत्री रोहन खंवटे

काही क्षणातच तरूण पाण्यात दिसेनासा झाला. याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने तलावात शोधमोहीम सुरू केली. तलावाच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमली होती.

कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. छठसारख्या पवित्र सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे दावडी परिसरातील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तलावात बेपत्ता झालेल्या जुगनूचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Dombivli Chhath Puja Accident
Air Chief Marshal : 'हनी ट्रॅप' की 'सायबर हेरगिरी' भारतीय लष्‍करासमोर मोठे आव्‍हान कोणते? एअर चीफ मार्शल यांनी दिले उत्तर

या घटनेने पुन्हा एकदा तलाव, घाट आणि पाण्याच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सण-उत्सवाच्या काळात पाण्यात उतरताना खोलीचा अंदाज घेणे, लहान मुले आणि तरूणांनी काळजी घेणे किती गरजेचे आहे, हे या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.