Yuva Connect 2026 Porvorim Goa |युवक नोकरी देणारा असावा, मागणारा नव्हे: मंत्री रोहन खंवटे

Yuva Connect 2026 Porvorim Goa | युवक नोकरी देणारा असावा, मागणारा नव्हे; पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे तरुणाईला मोलाचे मार्गदर्शन
Yuva Connect 2026 Porvorim Goa
Yuva Connect 2026 Porvorim Goa
Published on: 
Updated on: 

पर्वरी (पुढारी वृत्तसेवा):

आजचा युवक नोकरी मागणारा नसून नोकरी उपलब्ध करून देणारा असावा, ही आमची धारणा आहे. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा आणि योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

Yuva Connect 2026 Porvorim Goa
Goa Porvorim flyover accident report update|पर्वरी उड्डाणपुलावरील अपघात अहवालाची प्रतीक्षा कायम

पर्वरी रायझिंग आयोजित 'युवा कनेक्ट-२०२६' या कार्यक्रमात मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेन्ह द फ्रान्सचे जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य अमित अस्नोडकर, सरपंच सोनिया संजय पेडणेकर, स्वप्नील चोडणकर, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष विनीत परब, युवा भाजप मंडळाचे अध्यक्ष भटा कांबळी, तसेच तिन्ही पंचायतींचे उपसरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.

मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, 'युवा कनेक्ट' ही संकल्पना आमच्या युवकांच्या आग्रहानुसार राबवण्यात आली आहे. पर्वरीत महिला दिन, शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतो, मग आमच्यासाठी काय करता, अशी मागणी युवकांनी केली होती. त्यानुसार 'पर्वरी रायझिंग'तर्फे 'युवा कनेक्ट-२०२६' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Yuva Connect 2026 Porvorim Goa
Porvorim Firing Case | पर्वरी गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार गोपाळ नाईक जेरबंद; साधूच्या वेशात गोव्याबाहेर पळण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'विकसित भारत-२०४७' चे तुम्हीच खरे नेते आहात. तुम्हाला सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी आहे; मात्र विकसित भारत, विकसित गोवा आणि विकसित पर्वरी करण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे त्यांनी नमूद केले.
पर्वरीचा उड्डाणपूल बांधून तयार झाला, परंतु पर्वरीच्या नागरिकांना अटल सेतूवर जाण्यास मिळत नाही, याची आम्हाला जाणीव आहे.

त्यावर हे वर्ष संपण्यापूर्वी योग्य तोडगा काढण्यात येईल, असेही मंत्री खंवटे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी संदीप साळगावकर, अमित अस्नोडकर आणि सोनिया पेडणेकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमांतर्गत दिवसभर विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लगोरी, पेनल्टी शूट, बॉक्स क्रिकेट, स्किपिंग, ह्युमन रिले, रांगोळी, समूह नृत्य, रील मेकिंग, ध्वज पेंटिंग, डीजे आदी खेळांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.