डोंबिवली : घर, दुकान गाळे विक्रीच्या नावाखाली ४८ जणांची ३ कोटींची फसवणूक

डोंबिवली : घर, दुकान गाळे विक्रीच्या नावाखाली ४८ जणांची ३ कोटींची फसवणूक

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : बी. एस. यू. पी योजनेतील घर आणि दुकान गाळे विकत देतो, असे सांगून ४८ जणांची एकाने बनावट कागदपत्र तयार करून ३ कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, त्याने ४८ जणांना बी. एस. यू. पी योजनेतील घरे तसेच दुकाने ताब्यात दिली नसल्याने त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, इंदिरा नगर येथे डीएसपी योजनेअंतर्गत बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी दोन दुकान गाळे खरेदी करण्यासाठी फिर्यादी कांतालाल व त्यांचे वडील शंकरलाल भानुशाली यांनी सुरेश पवार यांना १२ लाख रुपये दिले आहेत. मात्र, त्यांनी ना गाळे दिले, ना पैसे परत दिले. इतकेच नव्हे तर ४८ जणांना स्वस्त दरात दुकाने आणि घरे देतो, असे सांगून त्यांचीदेखील फसवणूक केली.

विशेष म्हणजे या सर्वांना कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हस्तांतरित केल्याचे बनावट कागदपत्र , बी.एस यू. पी चे बनावट कागदपत्र दिले. एकूण ३ कोटी ४७ लाखांची पवार यांनी फसवणूक केली. तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news