

ठाणे : दिवाळी शब्द ऐकताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे कंदील, लाल मातीचे दिवे, फटाके आणि त्यांत विशेष म्हणजे दिवाळीची मिठाई. दिवाळी सणात कंदील आणि दिव्यांच्या रोषणाईसोबत मिठाईंच्या गोडव्याचेही तितकेच महत्व आहे. मात्र दिवाळीच्या सणात जिभेचे चोचले पुरविणाऱ्या या मिठाईला महागाईची झळ लागल्याने ऐन दिवाळी सणात गोडधोड पदार्थ, मिठाईचे दर सर्वसामान्यांना परवडेनासे झाले आहेत.
महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये पेढा, बर्फी आणि इतर मिठाईंसाठी उपयुक्त असलेला मावा पदार्थ सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून दरदिवशी भरपूर प्रमाणात निर्यात केला जातो. तसेच माव्या प्रमाणे दूध, तूप आणि दुग्ध पदार्थ यांच्या निर्यात दरात देखील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हे आघाडीवर आहेत. या सामग्रींमुळे मिठाई बनवली जाते; परंतु अलीकडे पेढ्यांमध्ये, बर्फीमध्ये निरनिराळे प्रकारचे रंग, फळांच्या चवीचे फ्लेवर वापरून पदार्थ बनवले जातात या दरम्यान कुठेतरी जिभेच्या चवीसाठी खिश्याला अधिक फटका बसत असल्याचा अनुभव येत आहे. तसेच मिठाईमध्ये विशेष होणाऱ्या बदलामुळे.
काही आराखड्यानुसार 5 वर्षा अगोदर आणि अलीकडच्या दिवसांमध्ये पेढ्यांच्या आणि बर्फिचे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये मिठाई घ्यायची की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच्या काळामध्ये आणि अलीकडच्या दिवसांमध्ये मिठाईच्या दरात भरपूर फरक पडलेला दिसतो. मिष्टान्नांची बाजार प्रतिष्ठा न जुमानता मावा बर्फीचे 5 वर्षा अगोदरचे दर 350 रु. 1 किलो होते आणि आता तेच दर 750-800 रुपयेने वाढले आहे.
त्याचप्रमाणे पेढ्याचे अगोदरचे दर 250 रु 1 किलो होते आणि आता तेच दर 400 रु. किलोने वाढले म्हणजे तब्ब्ल 200 रुपये अधिक झाले आहे. तसेच कलाकंद, मोतीचूर लाडू, घुजीया, काजूकतली आणि इतर मिठाईचे दर चवीमुळे 200 ते 600 रुपये इत्पत वाढलेले दिसते. रसमलाई, गुलाबजाम, चम-चम, काळा जामून सारखे मिठाईचे प्रकार हंगामी काळात अजून महागतात.
मोठमोठ्या स्वीट मार्टपासून छोट्या मिष्ठान्न पदार्थांमध्येसुद्धा मिठाईच्या दराची आगळीवेगळी रक्कम पाहायला मिळते. महागाईच्या काळात दुधाचे, माव्याचे आणि इतर सुक्या मेवाचे दर महागले आहेत. मिठाई घेणाऱ्या ग्राहकांनुसार गेल्या 5 ते 6 वर्षाअगोदर एवढे मिठाईचे दर वाढले नव्हते. परंतु अलीकडच्या वर्षांमध्ये मिठाईचे दर आणि प्रमाण अधिक प्रमाणात वाढलेले दिसून येत आहेत.
मिठाईतून लूट
काही ग्राहकांच्या मते मिष्ठान्न हंगामी काळात मिठाईसाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीवर 30% जीएसटी लावतात असे म्हणणे आहे; परंतु मजेशीर भाग बाजूला ठेवून भारत सरकारद्वारे प्रत्येक मिठाईवर 5% जीएसटी वाढवली आहे, तरी मिठाईच्या सामग्रीवर म्हणजे साखर 5%, मैदा 5%, तेल आणि तूप 5% जीएसटी आरक्षित आहे, तर काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार दिवाळी, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव आणि दसरा इत्यादी सण मिठाईवाल्याचे हक्काचे सण असून या सणांमध्ये ग्राहकांकडून मनसोक्त पैसे लुटण्याचे हक्क मिठाईवाल्यांकडून चांगल्यारीत्या बजावले जात असल्याचे म्हणणे आहे.