Cow Rescue: मोठी दुर्घटना टळली! दिवा रेल्वे स्थानकावर लोकलखाली अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका

आरपीएफ, जीआरपी व प्रवाशांच्या तत्परतेने गायीचा जीव वाचविण्यात यश
Cow Rescue
Cow RescuePudhari
Published on
Updated on

दिवा: दिवा रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे काही काळ लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. एक गाय लोकल ट्रेनखाली अडकल्याने परेल-कल्याण स्लो लोकल काही काळ स्थानकातच थांबविण्यात आली. मात्र रेल्वे कर्मचारी, आरपीएफ, जीआरपी, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि प्रवाशांच्या तत्परतेमुळे गायीचा जीव वाचविण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.४८ वाजण्याच्या सुमारास पहिला रेल्वे फाटक बंद होताना एक गाय रेल्वे परिसरात शिरली. त्याचवेळी परेलहून कल्याणकडे जाणारी स्लो लोकल दिवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत होती. ट्रेनचे केवळ दोन डबे बाकी असताना गाय रुळांमध्ये अडकली. सुदैवाने गाय रुळांवर बसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Cow Rescue
Vegetable Price Hike: पावसाचा फटका; भाज्यांचे भाव कडाडले

मोटरमन आणि गार्ड यांच्या प्रसंगावधानामुळे लोकल अतिशय सावधगिरीने पुढे नेण्यात आली. दरम्यान, आरपीएफ, जीआरपी, महाराष्ट्र सुरक्षा बल, रेल्वे कर्मचारी, प्रवासी तसेच स्थानक परिसरात बूट पॉलिशचे काम करणारे बीरबल राम यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने रुळांवर पडलेल्या गायीला वर ओढून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर गाय तात्काळ उभी राहिल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या घटनेमुळे दुपारी १२.४८ ते १.१८ या सुमारे अर्धा तास कालावधीत लोकल सेवा प्रभावित झाली. परिणामी अनेक प्रवाशांनी मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान रुळांलगत पायी चालत दिवा स्थानक गाठले.

घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे पदाधिकारी नयन भगत, यश भोईर, विराज पाटील यांच्यासह गौरक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी गायीला उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी नेले.

Cow Rescue
Matheran Toy Train: 'माथेरानच्या राणी'ला हरित ऊर्जेची साथ! हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

गौरक्षक नयन भगत यांनी सांगितले की, पशुवैद्यकांकडून गायीवर उपचार करण्यात येणार असून सध्या गाय चालत-फिरत आहे तसेच चारा देखील खात आहे. दिवा स्थानकाचे उपस्थानक प्रबंधक शशिकांत माने यांनी सांगितले की, ड्युटीवरील पॉइंट्समन मंगेश गुप्ता, श्यामसुंदर मौर्या, विकास गुप्ता यांच्यासह अनेक प्रवाशांनी मानवतेचा परिचय देत गायीला वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news