Matheran Toy Train: 'माथेरानच्या राणी'ला हरित ऊर्जेची साथ! हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
Matheran Toy Train
Matheran Toy TrainPudhari
Published on
Updated on

आनंद सकपाळ

नेरळ: ब्रिटिशकालापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणांवरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची हेरिटेज मिनी ट्रेन आता हरित तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

हेरिटेज दर्जा लाभलेल्या या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनाची जोड देण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासह पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भारतीय रेल्वेने हेरिटेज रेल्वे मार्गांचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवत त्यांना आधुनिक आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हायड्रोजन फॉर हेरिटेज ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

Matheran Toy Train
RTO Traffic Checking Drive: डोंबिवलीत ८० हून अधिक रिक्षा, वाहनचालकांना दणका

या योजनेत देशातील निवडक हेरिटेज रेल्वे मार्गांसह नेरळ-माथेरान हिल रेल्वेचाही समावेश केला आहे. सध्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन डिझेल इंजिनावर धावते. भविष्यात हायड्रोजनवर चालणारे इंजिन कार्यान्वित झाल्यास धूर आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे.

पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या माथेरानसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, स्वच्छ ऊर्जा व शाश्वत पर्यटनाच्या दिशेने तो एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचे माथेरानचे ध्येय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्या, घनदाट जंगल आणि नागमोडी वळणांमधून धावणारी जगप्रसिद्ध नेरळ-माथेरान हेरिटेज मिनी ट्रेन; लवकरच या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता असून, हरित पर्यटन आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Matheran Toy Train
Thane Monsoon Rainfall: ठाण्यात १० दिवसांत १,२७३ मिमी पाऊस, तक्रारी सातपट

पर्यटक, रेल्वेप्रेमींना प्रतीक्षा

दरम्यान, हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर माथेरानच्या मिनी ट्रेनलाही अशाच तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याने पर्यटक, स्थानिक नागरिक आणि रेल्वेप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, माथेरानच्या मिनी ट्रेनवर हायड्रोजन इंजिन नेमके कधी धावणार, याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे 'माथेरानची राणी' हरित ऊर्जेवर धावताना पाहण्याची प्रतीक्षा आता पर्यटकांसह सर्व रेल्वेप्रेमींना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news