Kalyan Crime | कल्याणमध्ये तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव ? डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Kalyan Religious Conversion Case

नेवाळी : तरुणीला प्रेमाच्या संबंधातून कथितरीत्या धर्मांतर व निकाहासाठी दबाव आणल्याचा, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून धमकावल्याचा गंभीर आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित डॉक्टर विरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणी अल्पवयीन असताना 2020 पासून आरोपीच्या क्लिनिकमध्ये कामासाठी जात होती. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने तिच्याशी जवळीक वाढल्यानंतर आरोपीने तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारीनुसार, कामाच्या मोबदल्याच्या बदल्यात रात्री उशिरापर्यंत काम करण्यास भाग पाडणे, अश्लील भाषेत बोलणे आणि शरीरसंबंध ठेवण्याचा दबाव आणल्याचे आरोप आहेत. तक्रारीनुसार, 2021 मध्ये कल्याण पश्चिम परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन आरोपीने स्वतःचे ओळखपत्र दाखवत आपण तिचा पती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिच्या संमती शिवाय शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

Crime News
Kalyan Fire | कल्याण - शिळ रस्त्यावरील सोफेस्टिका इमारतीला भीषण आग

2024 मध्ये लग्नासाठी दबाव आणण्यात आला होता. आ ई- वडिलांच्या संमतीशिवाय लग्न होऊ शकत नसल्याचे सांगूनही आरोपीने दबाव कायम ठेवला. त्यानंतर 16 ऑगस्ट 2025 रोजी तिला वांद्रे, मुंबई येथील न्यायालयात नेण्यात आले. तेथे काही कागदपत्रांवर तिची सही घेण्यात आली. त्यानंतर ‘तू इस्लाम कबूल केला आहेस’ असे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. मात्र, आपण कोणत्याही प्रकारे इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचे तरुणीने स्पष्ट केले आहे.

यानंतर 21 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीने तिला वांद्रे येथील एका कार्यालयात नेले होते. तेथे मौलवीच्या उपस्थितीत तिच्या इच्छेविरुद्ध निकाह लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना देऊ नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले आहे.

Crime News
Kalyan Dombivli Stray Dogs : कल्याण-डोंबिवलीत भटक्या श्‍वानांची दहशत वाढली

दरम्यान, आरोपीकडून कुटुंबीयांना धमकावणे, फोनवरील स्टेटसच्या माध्यमातून धमकी देणे तसेच घरच्यांना इजा करण्याची भाषा केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे अखेर तरुणीने धाडस करून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news