Kalyan Fire | कल्याण - शिळ रस्त्यावरील सोफेस्टिका इमारतीला भीषण आग

- सोफेस्टिका इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
Kalyan Sophistica Building Fire
Kalyan Sophistica Building Fire Pudhari
Published on
Updated on

Kalyan Sophistica Building Fire

नेवाळी : कल्याण - शिळ रस्त्यावरील कासाबेला गोल्ड परिसरातील सोफेस्टिका इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी तत्काळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिल. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आवश्यक बंब व साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Kalyan Sophistica Building Fire
Kalyan Dombivli News | कल्याण-डोंबिवलीत कत्तलखाने स्वातंत्र्यदिनी २४ तासांसाठी बंद

आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारी घेत परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती.आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र, वेळीच बचावकार्य आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत असून, आगीचे कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news