Thane News : ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीसाठी अधिसूचना

घोडबंदर रोडवर 8 ते 10 मेदरम्यान वाहतूक बदल
Brahmand Junction foot over bridge girder work
ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणीसाठी अधिसूचनाAI image
Published on
Updated on

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर (फुटओव्हर ब्रिज) गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.

घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपो जवळ फुटओव्हर ब्रिजवर आरपीएस पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 8 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 9 मे रात्री 11.55 वाजेपर्यंत तसेच 9 मे रात्री 11.55 वाजल्यापासून 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Brahmand Junction foot over bridge girder work
President visit to Nagpur | राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त वर्धा रोडवर वाहतुकीत बदल

या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तरी, जड - अवजड वाहनांनी या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणे टाळावे. असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Brahmand Junction foot over bridge girder work
Varandh Ghat Closure: वरंध घाट रस्ता 30 एप्रिलपर्यंत बंद; रस्त्याच्या कामामुळे निर्णय

दरम्यान, ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक विभागाने नमूद केले आहे.

हे मार्ग राहणार बंद

  • घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा-ब्रह्मांड सिग्नलमार्गे कापुरबावडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

  • एमजी मोटर्स शोरूम, मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही ब्रिज चढणीवर प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग

  • कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रह्मांड सिग्नलवरून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा समोरील चौक, कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे कापुरबावडीकडे जावे.

  • घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिजलगतच्या स्लिप रोडने नागोरी टी स्टॉलजवळ डावीकडे वळून टिकुजीनी वाडी सर्कलमार्गे वेरिएंट निलकंठ ग्रीन समोरील रस्त्याने मुल्लाबाग कटमार्गे इच्छितस्थळी जावे, असेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news