President visit to Nagpur | राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त वर्धा रोडवर वाहतुकीत बदल

Nagpur Traffic Updates | राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त जड वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे
President visit to Nagpur | राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त वर्धा रोडवर वाहतुकीत बदल
Published on
Updated on

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवारी (दि) सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास नागपुरात विमानाने आगमन होईल. वर्धा रोडवरील जामठा परिसरातील ब्रह्माकुमारीज 'विश्वशांती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम संपल्यानंतर त्या सिव्हिल लाइन्समधील लोकभवन येथे मुक्काम करतील. गुरुवारी सकाळी ९.५० वाजताच्या सुमारास त्या लोकभवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जातील. दरम्यान, उद्या सायंकाळी 5 ते 8 आणि गुरुवारी सकाळी 7 ते 10 दरम्यान ठिकठिकाणी बंदोबस्त लक्षात घेता एक तास हाताशी ठेवत वाहनचालकामी प्रवास करावा असे आवाहन पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त जड वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. वर्धा मार्गावरून डोंगरगाव टोलनाक्याकडून नागपूर, जबलपूर, भंडाराकडे जाणारी जड वाहतूक डोंगरगाव टोलनाका येथून गुमगावमार्गे समृद्धी झिरो सर्कलकडे वळविण्यात आली आहे. वर्धा मार्गावरून बुटीबोरीमार्गे जाणारी जड वाहतूक दाताळा गावमार्गे समृद्धी झिरो सर्कलकडे, समृद्धी महामार्गावरून अमरावतीकडून नागपूरकडे येणारी वाहतूक समृद्धी झिरो सर्कल-वृंदावन कटिंग येथे थांबविण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news