Thane politics : ठाण्यात शिवसेनेशी होणाऱ्या युतीबाबत भाजप सावध भूमिकेत

उद्यापासून होणार शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाची बोलणी
Thane politics
शिवसेना-भाजप युतीfile photo
Published on
Updated on

ठाणे : मुंबईप्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीमध्ये निवडणूक लढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमत झाले आहे. त्यानुसार मुंबईत महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका सुरु झाल्या असल्या तरी ठाण्यात अद्याप युतीमध्ये निवडणूक लढवायची की नाही यावर अद्याप स्थानिक स्थरावर चर्चा झालेले नाही. त्यामुळे आज झालेल्या शिवसेना आणि भाजपच्या बैठकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरूच ठेवा, असे निर्देश स्थानिक नेतृत्वाकडून इच्छुकांना देण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या युतीच्या बैठकांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Thane politics
Maharashtra politics : मुंबईत भाजपाला, ठाण्यात शिंदेंना झुकते माप

ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. ठाणे महापालिकेवर शिवसेनेचे राज्य असून त्यांचा भगवा झेंडा गेली 30 वर्ष फडकत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचे सूत्रे स्वीकारल्यानंतर ठाण्यात शिवसेनेत प्रवेश करण्याचा ओघ वाढला आहे. 2017 मध्ये 67 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेकडे आता 85 जागा झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या हाती शिवधनुष्य देऊन शिवसेनेने भाजपाला चपराक दिलेली आहे. उलट भाजपचे नगरसेवक कमी झाले. त्याचे 23 नगरसेवक जिंकून आले होते. भाजपने स्वबळाचा नारा देऊन शिवसेनेवर टीकेची झोड उठविलेली होती.

वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान देऊन भाजपचा महापौर बसविण्याची घोषणा केली. त्यामुळे ठाण्यात युती होणार नाही, असे चित्र तयार झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मुंबईप्रमाणे ठाण्यातही युती करण्याचा वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला. त्यानुसार आचारसंहिता लागू होताच शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे बैठका घेऊन आपल्या कार्यकर्त्याची सूचना आणि भावना जाणून घेतल्या. भाजपच्या बैठकीत 131 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवावी अशाही सूचना स्थानिक नेत्यांनी इच्छुकांना दिल्या आहेत. 2012 मध्ये युतीची बोलणी सुरु असताना ऐनवेळी युती फिस्कटली आणि भाजपला तोंडावर आपटावे लागले होते, याची आठवण करून देत सन्मानजनक जागा मिळविण्यासाठी शिवसेनेशी सुरु होणाऱ्या युतीच्या बोलणीबरोबर स्वबळाची तयारी सुरूच ठेवावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार युती अथवा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप युतीच्या जागा वाटपाबाबत उद्यापासून बैठकीला सुरुवात होणार असून त्यासाठी दोन्ही पक्षाची समिती नियुक्त करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

Thane politics
Pimpri Chinchwad Municipal Election Political Battle: पिंपरी-चिंचवड महापालिका रणधुमाळी; अजित पवारांचे फोडाफोडीचे राजकारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news