Bhiwandi Shawarma Food Poisoning : भिवंडीतील शॉरमा विषबाधा प्रकरणाचे कल्याणमध्‍ये पडसाद

शोरमा विक्रेत्यांवर कारवाईसाठी ठाकरे गट आक्रमक; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Bhiwandi Shawarma Food Poisoning
Bhiwandi Shawarma Food Poisoningpudhari photo
Published on: 
Updated on: 

सापाड : भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्ल्यामुळे शेकडो नागरिकांना विषबाधा झाल्याच्या घटनेचे पडसाद आता कल्याण शहरात उमटू लागले आहेत. या घटनेची पुनरावृत्ती कल्याणमध्ये होऊ नये आणि नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. शहरातील शोरमा विक्री केंद्रांची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या महिला उपशहर संघटक आरती पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौरांसह महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कल्याण डोंबिवलीत खाद्यपदार्थांच्या विक्रीचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. नागरिकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ म्हणून शोरमाची लोकप्रियता वाढत असताना त्याच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Bhiwandi Shawarma Food Poisoning
Vasai Historical Places : गतवैभवाच्या पाऊलखुणा जपणारी आगाशी-सोपारा बंदरे विस्मृतीत

कल्याण शहरातील विविध चौक, बाजारपेठा आणि वर्दळीच्या रस्त्यांवर शोरमा विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, या ठिकाणी वापरण्यात येणारे मांस योग्य तापमानात साठवले जाते का? खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते का? तसेच विक्री केंद्रांकडे आवश्यक परवाने आहेत का? याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.

विशेषतः मांसाहारी खाद्य पदार्थांच्या बाबतीत साठवणुकीचे तापमान, शीतकरण यंत्रणा, स्वच्छ पाणी, खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. यापैकी कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे केवळ विक्री केंद्र सुरू असल्याने त्याठिकाणी सुरक्षित खाद्यपदार्थ मिळतात, असे गृहीत धरता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आरती पवार यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देत कल्याण शहरातील सर्व शोरमा विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे.

Bhiwandi Shawarma Food Poisoning
Geographical Indication Registration : कोकण हापूस विरुद्ध गुजरात वलसाड आंबा

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केवळ शोरमा विक्री केंद्रांपुरती मर्यादित न राहता शहरातील हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, हातगाड्या आणि इतर खाद्यविक्री केंद्रांचीही नियमित तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भिवंडीतील घटनेनंतर कल्याणमध्येही अन्नसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.