

भिवंडी : पीडित महिलांना वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्या माध्यमातून आर्थिक फायदा करून घेणाऱ्या वेश्या व्यवसायातील दलाल महिलेस ठाणे पोलिस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करीत दोन पीडित महिलांची सुटका करीत तिघांविरोधात पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुशरत अन्सार मिर्झा, वय 40 वर्षे, रा.सांताक्रुझ पुर्व, मुंबई असे अटक महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला 20 जानेवारी मिळाली होती की,भिवंडी तालुक्यातील गोवे नाका येथील हॉटेल येथे वेश्या व्यवसायातील एक महिला दलाल काही पीडित महिलांना त्यांच्या असहायतेच फायदा घेऊन वेश्या व्यवसायास लावून त्यातून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे समजले.
त्यानुसार दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत मुशरत अन्सार मिर्झा हीस ताब्यात घेत तिच्या ताब्यातून 36 व 33 वर्षीय दोन पीडित महिलांची सुटका करीत या तिघा महिलां विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दलाल महिला मुशरत अन्सार मिर्झा हीस अटक केली आहे.