Thane Crime : भाईंदरमध्ये नात्याला काळिमा; सावत्र बापाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

घटनेने परिसरात खळबळ
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

मिरा रोड : भाईंदर परिसरात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, गुन्हा घडल्यानंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मुंबईतील वांद्रे परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News
Navi Mumbai airport cargo service : नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र पित्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत वांद्रे परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

Crime News
Dombivli Crime : डोंबिवलीत भीतीपोटी हाताची नस कापून महिलेने जीवन संपवले

आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून आरोपीविरोधात न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्याची तयारी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news