Navi Mumbai airport cargo service : नवी मुंबई विमानतळावर पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान

‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
Navi Mumbai airport cargo service
Navi Mumbai airport cargo servicepudhari photo
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७-४०० एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.

नॅशनल एअरलाइन्सच्या ऐतिहासिक बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. मालवाहतूक घेऊन आलेल्या या दिग्गज विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला. नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात सध्या नऊ बोईंग ७४७ मालवाहू विमाने आहेत. मोठ्या प्रमाणातील मालाची वाहतूक, मानवतावादी मदत आणि विशेष मालवाहतूक सेवांसाठी या विमानांचा वापर केला जातो.

Navi Mumbai airport cargo service
Mumbai municipal school security : शाळा आहे की बकऱ्यांचा अड्डा..!

दि. १ ऑगस्ट रोजी इंडिगो कार्गोच्या एअरबस ए३२१ पी२एफ विमानाने नवी मुंबई विमानतळावरील लहान आकाराच्या मालवाहू विमानसेवेची सुरुवात केली. त्यानंतर दि.१६ ऑगस्ट रोजी हाँगकाँग एअर कार्गोने एअरबस ए३३० मालवाहू विमानाद्वारे नवी मुंबईतून मोठ्या आकाराच्या मालवाहू विमानांची सेवा सुरू केली. हाँगकाँग एअर कार्गो ही नवी मुंबई विमानतळावर समर्पित मालवाहू सेवा सुरू करणारी पहिली आंतरराष्ट्रीय विमान कंपनी ठरली. 

हाँगकाँग आणि नवी मुंबईदरम्यान कंपनीकडून आठवड्यातून तीन मालवाहू उड्डाणे केली जात आहेत. याशिवाय अफकॉम कार्गोने ऑगस्टमध्ये नवी मुंबई विमानतळाला दुबई वर्ल्ड सेंट्रलशी जोडले आहे. त्यामुळे नवी मुंबईला आणखी एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक मार्ग मिळाला आहे. लहान आकाराच्या मालवाहू विमानांपासून एअरबस ए३३०सारख्या मोठ्या विमानांपर्यंत आणि आता बोईंग ७४७पर्यंत झालेली ही वाटचाल नवी मुंबई विमानतळाची मालवाहतूक क्षमता वेगाने वाढत असल्याचे दर्शवते.

Navi Mumbai airport cargo service
Mumbai charas seizure : १० कोटींच्या चरसचा पुरवठादार जेरबंद; मुंबई गुन्हे शाखेची बिहारमध्ये कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news