Bhatsa Dam Water Stock: मुंबईची तहान भागवणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात पावसाची दडी; पाणीसाठ्यावर ताण

पुढील काळात पाणीसाठ्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान; धरणातील साठ्यावर ताण येण्याची शक्यता
Bhatsa Dam
Bhatsa Dam File Photo
Published on
Updated on

दिनेश कांबळे

डोळखांब: मुंबईची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात सप्टेंबरच्या उत्तरार्धात पावसाने अक्षरशः दडी मारली आहे. १९ सप्टेंबरच्या सकाळी संपलेल्या २४ तासांत भातसा परिसरात एकही मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही.

दुसरीकडे मुंबईला दररोज मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा सुरू असल्याने धरणातील साठ्यावर सातत्याने ताण येत आहे. सध्या भातसा धरणात ९९.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून ७ लाख ११ हजार ८२४ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे.

Bhatsa Dam
Lalbaugcha Raja Darshan Fraud: लालबागच्या राजाच्या थेट दर्शनाचे आमिष महागात पडले! चार भाविकांची फसवणूक; बारावीतील विद्यार्थी अटकेत

त्यामुळे तातडीची पाणीटंचाई नसली तरी सप्टेंबर अखेर पर्यंत पावसाने पाठ फिरविल्यास पुढील उन्हाळ्यात मुंबईच्या पाणी नियोजनासमोर आव्हान उभे राहू शकते.

शहापूर तालुक्यातील भातसा हे मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे धरण आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट अखेरपर्यंत धरण क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने धरण तुडुंब भरले होते. धरणाची पातळी वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे उघडण्याची वेळही आली होती.

मात्र सप्टेंबरमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थितीत अचानक बदल झाला आहे. १९ सप्टेंबर रोजी भातसा धरणाची पातळी १४१.८८ मीटर होती, तर पूर्ण पातळी १४२.०७ मीटर आहे. त्यावेळी धरणात ९९.२७ टक्के उपयुक्त साठा होता.

यंदाच्या हंगामात भातसा धरण परिसरात २,६८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सप्टेंबरच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण जवळपास ठप्प झाले आहे. त्यामुळे धरणात साठा मुबलक असला तरी त्यात नव्या पाण्याची भर पडण्याचा वेग सध्या अत्यल्प आहे.

Bhatsa Dam
Sahil Wakode Case: IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; पालकांच्या आंदोलनानंतर निर्णय

सध्या धरणात ९९ टक्केहून अधिक साठा असल्याने आज किंवा उद्या मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट येईल, अशी परिस्थिती नाही. मात्र सप्टेंबरचा उर्वरित कालावधी व त्यानंतरच्या कोरड्या महिन्यांत पाण्याचा वापर सुरूच राहणार आहे.

त्यात पुढील उन्हाळ्यातील वाढती मागणी लक्षात घेता साठ्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. यंदाची स्थिती समजून घेण्यासाठी मागील वर्षांच्या पावसाची तुलना महत्त्वाची ठरते.

शहापूरच्या सप्टेंबर महिन्याच्या उपलब्ध हवामान नोंदीनुसार २०२४ मध्ये ४२७.८९ मिमी, तर २०२५ मध्ये ३५८.८० मिमी सप्टेंबर पाऊस नोंदला गेला होता. यंदा मात्र सप्टेंबरच्या उत्तरार्धात भातसा परिसरात पावसाची मोठी विश्रांती आहे. त्यामुळे भुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये १५ सप्टेंबर २०२६ रोजी एकूण ९७.९४ टक्के साठा होता. भातसा त्यावेळी १०० टक्के दर्शविला गेले होते; त्यानंतर १९ सप्टेंबरला तो ९९.२७ टक्क्यांवर आले.

म्हणजेच साठा अजूनही समाधानकारक असला तरी पावसाची भर न पडता नियमित पाणी उपसा सुरू राहिल्यास पातळीत हळूहळू घट होणारच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका व नागरिकांनी आतापासून पाणी काटकसरीने वापरणे, पाणीगळती व अनधिकृत जोडण्यांवर नियंत्रण ठेवणे, पावसाचे पाणी साठविण्याच्या उपाययोजनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news