Sahil Wakode Case: IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; पालकांच्या आंदोलनानंतर निर्णय

IIT Bombay Student Case: IIT बॉम्बे विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
IIT Bombay
IIT BombayPudhari
Published on
Updated on

मुंबई: आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी पवई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

गुन्हे शाखेतील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास देण्यात आला आहे.घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात साहिलच्या पालकांनी आंदोलक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींवर कारवाईची मागणी केली. सुमारे सात तासाच्या चर्चनंतर तपास गुन्हे शाखेकडे देण्याचे आश्वासन मिळाल्यावर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

IIT Bombay
Devendra Fadnavis on UPI Charges: UPI शुल्कावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका; व्यापारी-पेट्रोल पंपधारकांना म्हणाले, ‘विरोध करू नका’

प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांचे नाव

साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पालकांनी जातिवाचक अपमान व छळाचे आरोप केल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.

एफआयआरमध्ये प्रा. सूर्यनारायण डुल्‍ला यांचे नाव आहे. ते साहिलचे शिक्षक तसेच ज्या परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याचा प्रकार समोर आला, त्या परीक्षेचे पर्यवेक्षक होते.

दुसरीकडे, आयआयटी बॉम्बेच्या अनुसूचित जाती-जमाती विद्यार्थी व कर्मचारी कक्षाकडे साहिलने जातीय भेदभावाबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनीही कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाचा आरोप फेटाळला आहे.

शुक्रवारी परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल वापरताना आढळला. त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका उत्तरे मिळविण्यासाठी चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती.

IIT Bombay
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील वेगाला लगाम कधी? वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

प्रा. डुल्‍ला आणि विभागप्रमुखांनी त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तो वसतिगृहातील खोलीत परतला. मात्र सायंकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळला. विद्यार्थ्यांनी मात्र साहिलला संभाव्य निलंबनाची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी सलग दोन दिवस आंदोलन केले. स्वतंत्र व पारदर्शक चौकशी, तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि संस्थात्मक पातळीवर बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. काही विद्यार्थी संघटनांनी संचालक आणि अधिष्ठात्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

सात तासांच्या चर्चेनंतर मृतदेह ताब्यात

राजावाडी रुग्णालयात साहिलचा मृतदेह ठेवण्यात आल्यानंतर त्याच्या पालकांनी आरोपींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले.

सुमारे सात तासांच्या चर्चेनंतर गुन्हे शाखेकडे तपास सोपविणे, संयुक्त पोलिस आयुक्तांच्या स्तरावर समिती नेमणे तसेच आरोपींच्या संभाव्य अटकपूर्व जामिनाला विरोध करण्याबाबत आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून देण्यात आल्‍यानंतर पालकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र : सुजात

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले असून याआधी अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी व आता साहिल वाकोडे यांना प्राण गमवावा लागला. आयआयटी मुंबई जातीय छळाचा अड्डा बनला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.

आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात शिकणारे साहिलने शुक्रवारी वसतिगृहात आत्‍महत्‍या केली. साहिलच्या पालकांनी आयआयटीवर जातीय छळाचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news