Thane Coastal Road Phase: ठाणे किनारी मार्ग-1 ला वेग; 8 महिन्यांत 50% पायाभरणी पूर्ण

13.45 किमी सहापदरी ग्रीनफिल्ड मार्गात अत्याधुनिक मोनोपाइल तंत्रज्ञानाचा वापर; जेएनपीटी व वाढवण बंदराला थेट कनेक्टिव्हिटी
Thane Coastal Road Phase
Thane Coastal Road PhasePudhari
Published on
Updated on

मुंबई : ठाणे किनारी मार्ग - 1 या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे नेण्यात येत आहे. 8 महिन्यांत या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या पायाभरणीचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. पिअर कॅप आणि आय गर्डरच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

Thane Coastal Road Phase
RTE Fee Reimbursement: आरटीई शुल्क प्रतिपूर्ती वाढणार कधी? शाळा संस्थाचालकांचा सवाल

13.45 किमी लांबीचा, सहापदरी, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड मार्ग अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जात आहे. भारतात प्रथमच ग्रीनफिल्ड रस्ता प्रकल्पात जमिनीवर मोनोपाइल फाऊंडेशनसह सिंगल-पाइल, सिंगल-पियर प्रणालीचा वापर केला जात आहे. गायमुख येथे हा मार्ग गायमुख-फाउंटन हॉटेल बोगद्याशी थेट जोडला जाईल.

Thane Coastal Road Phase
CET 2026 Aadhaar authentication: सीईटी 2026 नोंदणीत आधार सक्तीवर यू-टर्न; विद्यार्थ्यांना अखेर दिलासा

यामुळे वाढवण बंदर, जेएनपीटी, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडे जाणारी मालवाहतूक सुलभ होईल. ठाणे किनारी मार्ग - 1 हा प्रकल्प ठाणे वर्तुळाकार मेट्रो, ठाणे किनारी मार्ग - 2, साकेत-आमणे उन्नत रस्ता आणि कासारवडवली-खारबाव मार्ग अशा महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांशीही थेट जोडला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news