Badlapur signal fine CCTV : बदलापुरात सिग्नल तोडला तर आता खैर नाही

लवकरच सिग्नल फाईन सीसीटीव्ही कॅमेरे; वाहनचालकांना ऑनलाईन दंड बसणार
Badlapur signal fine CCTV
बदलापुरात सिग्नल तोडला तर आता खैर नाहीpudhari photo
Published on
Updated on

बदलापूर : बदलापुरात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अद्याप सिग्नल फाईन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सिग्नल न पाळणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होत नव्हती. परंतु लवकरचं बदलापुरात सिग्नल फाईन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे सिग्नल चुकविणाऱ्या वाहनचालकांना ऑनलाइन दंड बसणार आहे. यासंदर्भात कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या पूर्व पश्चिम भागातील बहुतांश मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. ही सिग्नल यंत्रणा उभारल्यानंतर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल आणि वाहनकोंडी तसेच अपघात टळतील, अशी अपेक्षा होती. मात्र सिग्नल यंत्रणा उभारल्यानंतरही अनेक वाहनचालक सिग्नलचे पालन करताना दिसत नाहीत.

Badlapur signal fine CCTV
Ulhasnagar Municipal Corporation budget : उल्हासनगर महापालिकेचा 997 कोटींचा समतोल अर्थसंकल्प

लाल सिग्नल असताना वाहने घेऊन जाणे, डावीकडे वा उजवीकडे सिग्नल असताना उलट बाजूने वाहने घेऊन जाणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे सिग्नलचे पालन करीत वाहने चालवणाऱ्या तसेच सिग्नल पाहून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची मात्र तारांबळ उडते. त्यातून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आलेल्या चौकांमध्ये सिग्नल फाईन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी ठाण्याचे पोलीस आयुक आशुतोष डुंबरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे सिग्नल चुकविल्यास ऑटोमॅटिक पद्धतीने दंड होणार असल्याने बेशिस्त वाहन चालकांना आळा बसणार आहे.

Badlapur signal fine CCTV
Jogeshwari assault case : सिगारेट विक्रेत्याला शंभर मीटर फरफटत नेले!

पूर्वेकडील मॅक-डी चौक, घोरपडे चौक, डीजी वन चौक, प्रणव कंपनी चौक व पश्चिमेकडील लोटस पॉईंट, श्री कॉम्प्लेक्स, म.जी.प्रा. कार्यालयाजवळ, समर्थ चौक, म्हात्रे चौक आदी चौकाचे रुंदीकरण करून त्याठिकाणी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी सिग्नल चुकविल्यास ऑटोमॅटिक दंड आकारणी होणारे सीसीटिव्हि कॅमेरे तसेच ट्राफिक हवालदार नसल्याने, नागरिकांकडुन सिग्नलचे तंतोतंत पालन होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news