Jogeshwari assault case : सिगारेट विक्रेत्याला शंभर मीटर फरफटत नेले!

केवळ 870 रुपयांच्या वादातून जोगेश्वरीत घडला प्रकार; परिसरात खळबळ
Jogeshwari assault case
Jogeshwari assault casepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : जोगेश्वरी येथे एका सिगारेट विक्रेत्याला कारचालकासह त्याच्या तीन सहकाऱ्यांनी शंभर मीटर फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सिगारेटच्या 870 रुपयांच्या वादातून हा प्रकार घडल्याने तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली, तर इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Jogeshwari assault case
APMC mango arrival : एपीएमसीत तीन दिवसांत हापूसच्या 80 हजार पेट्यांची आवक

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ओशिवरा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. यातील तक्रारदार सिगारेट विक्रेता असून तो रात्रीच्या वेळेस रस्त्यावर सिगारेट विक्री करतो. मंगळवारी पहाटे चार वाजता एका कारमधून चारजण आले, त्यात एका महिलेसह तीन पुरुष होते. त्यांनी त्याच्याकडून 870 रुपयांचे सिगारेट घेतले, मात्र त्याने पैसे मागितले असता त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

यावेळी महिलेने त्याचे कॉलर पकडले, तर दुसऱ्याने त्याला हाताने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कारमधून शंभर मीटर फरफटत नेण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ओशिवरा पोलीस ॲक्शनमध्ये आले. सिगारेट विक्रेत्याने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देऊन चारही आरोपींविरुद्ध तक्रार केली.

Jogeshwari assault case
Belapur Ram Navami festival : बेलापूरमध्ये रामभक्तीचा जल्लोष; दोन शतकांची अखंड परंपरा

या तक्रारीनंतर महिलेसह चौघांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या कारचालकास अटक करण्यात आली असून इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news