Badlapur Municipal Budget: बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प; महिला, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर

दिव्यांगांना महिन्याला 2000 पेन्शन, कन्यांसाठी ‘नगराध्यक्षा सुकन्या’ योजना; करसवलतीचाही प्रस्ताव
Badlapur Municipal Budget
Badlapur Municipal BudgetPudhari
Published on
Updated on

बदलापूर : कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात पुढील पाच वर्षांच्या विकासाचे रोड मॅप यंदाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा घोरपडे यांनी व्यक्त केले. सोमवारी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी कुळगांव बदलापूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नगराध्यक्षांकडे गेल्या वर्षभराचा आणि पुढील वर्षभराचा लेखाजोखा नगराध्यक्षांकडे सादर केला.

Badlapur Municipal Budget
COVID Duty Death: कोविड कर्तव्यात मृत्यू झालेल्या शिपायाच्या कुटुंबाला दिलासा; 50 लाख भरपाईचे आदेश

कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या भरीव निधीची तरतूद योग्य पद्धतीने व्हावी व शहरात मोठे विकासकामांना गती मिळावी, या हेतूने बदलापूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विविध बाबींचा समाविष्ट करण्यात आल्याचे रुचिता घोरपडे यांनी अर्थसंकल्प सादरकरताना सांगितले. यात सर्वात महत्त्वाच म्हणजे पावसाळी पाण्याचे नियोजन होण्यासाठी नाल्यांची निर्मिती, अंडरग्राउंड ड्रेनेज, पाणीपुरवठा योजना, हॉस्पिटलची उभारणी तसेच नाट्यगृह आदींसाठी बदलापूर नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या प्रकल्पांच्या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधी उपलब्ध व्हावा, यासाठी नगरपरिषद स्वतः कर्ज रोखे उभारणार आहे. तसेच नागरिकांवर कोणत्याही प्रकारे कराचा बोजा न टाकता प्रामाणिक कर भरणाऱ्या नागरिकांना 50% सवलत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून राज्य शासनाने या बजेटला मंजुरी दिल्यानंतर नागरिकांना 50 टक्के कर सवलत मिळणार आहे.

शहरातील महिलांचा मानसन्मान आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याण विकास समितीच्या बजेटमध्ये तब्बल 150 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे रुचिता घोरपडे यांनी सांगितले. बदलापूर नगरपालिकेच्या पुढील 26 -27 या आर्थिक वर्षात एकूण 1098 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्प आणि सेवांसंदर्भात बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे.

Badlapur Municipal Budget
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडचा खर्च तब्बल 2,220 कोटींनी वाढला; प्रकल्प आता 14,941 कोटींवर

नगरपालिका शाळांचे सक्षमीकरण

कुळगांव बदलापूर नगरपालिका शाळांच सक्षमीकरण करण्याबरोबरच आवश्यकते मनुष्यबळ भरण्यासाठी कंत्राटी शिक्षक व शाळेच्या वर्ग खोल्या वाढवणे विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे गणवेश दप्तर वह्या पुस्तक रेनकोट चपला आधी सोयी सुविधा देण्याचा निर्धार यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांनी सांगितले. खाजगी शाळांच्या तुलनेत नगरपालिका शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच नगरपालिकेच्या शाळांचं शहरातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी साठी मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Badlapur Municipal Budget
Maharashtra Heatwave: मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

नगराध्यक्षा सुकन्या योजना

बदलापूर शहरात 8 मार्च 2026 नंतर जन्मलेल्या प्रत्येक कन्येला नगरपरिषदेमार्फत तिच्या जन्माच्या वेळी 5000/- रुपयांची बचत रक्कम तिच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. हि रक्कम संबंधित कन्येला तिच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण व्याजासह मिळणार आहे. सदर रक्कमेचा उपयोग तिला शिक्षण करण्यासाठी व्हावा, यासाठी नगरपरिषदेच्या या वर्षीच्या अर्थ संकल्पात 75 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी सांगितले. हि योजनेला एक आदर्श स्वरूप देऊन बदलापूर शहरातील जन्म झालेल्या कन्येचे स्वागत करण्याचा माझा मानस असल्याचे घोरपडे यांनी बजेट सादर करताना सांगितले.

Badlapur Municipal Budget
JNPT Containers Loot: जेएनपीए बंदरात अडकलेल्या कंटेनर्सवर एजंटांची लूट; एका कंटेनरसाठी 3–4 लाखांची वसुली

दिव्यांगांना महिना दोन हजार

कुळगांव बदलापूर शहरातील दिव्यांगांची गणना नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे. याद्वारे शहरात आतापर्यंत 500 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. या सर्व दिव्यांगांचे कल्याण करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. या सर्व दिव्यांगांना कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने 1000 मासिक पेंशन दिली जाते. या वर्षापासून सदर पेंशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या वर्षीपासून (1 एप्रिल 2026) या सर्व दिव्यांगाना मासिक 2000 पेंशन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना औषध उपचार करण्यासाठी यावर्षाच्या अर्थसंकल्पात एकूण दिव्यांगाना प्रत्येकी 20000/- देण्याचा करण्याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news