Badlapur Jamun Price: बदलापूरच्या जांभळांना बाजारात प्रचंड मागणी; पावकिलोला 100 रुपये दर

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार जांभळांचा हंगाम
Badlapur Jamun Price
Badlapur Jamun PricePudhari
Published on
Updated on

पंकज साताळकर

बदलापूर: बदलापूरच्या जांभळांनाही सोन्याचा भाव आला आहे. किरकोळ बाजारात पावकिलो जांभळांसाठी ग्राहकांना 100 रूपये मोजावे लागत आहेत. अविट गोडीची काळीभोर जांभळं ही बदलापूरची खास ओळख आहे. बदलापूरच्या जांभळाला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळालं आहे.

यंदा जांभूळप्रेमींना जांभळांसाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागले असले तरी जांभूळ विकणाऱ्या आणि पिकवणाऱ्यांना मात्र सुगिचे दिवस आले आहेत. जांभळाचे भाव वाढले असले तरी यंदा जांभळाचे पीकही मोठ्या प्रमाणात आल्यामुळे बदलापूरच्या जांभळांना फक्त बदलापूरातच नव्हे तर मुंबई आणि परिसरात मोठी मागणी वाढली आहे.

Badlapur Jamun Price
Mumbai night temperature |मुंबईत दिवसापेक्षा रात्रीची उष्णता वाढतेय वेगाने! CEEW चा धक्कादायक अहवाल

बदलापूरच्या आसपास अनेक छोटी-मोठी गावं असून याठिकाणची हलवा, काला खट्टा, गरवी, कोयनी ही जांभळं विशेष लोकप्रिय आहेत. या जांभळांना बाजारात मोठी मागणी असते. उन्हाळ्यात आदिवासी बांधव जांभूळाची बाजारात विक्री करत असतात. किरकोळ बाजारात जांभळांचा दर 400 रूपये किलो इतका झाला आहे.

जांभळांची एक पाटी अडीच ते तीन हजारला असल्यामुळे स्वस्त दरात जांभूळविक्री परवडत नसल्याचं आदिवासी महिलांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी याच जांभळांचा दर 50 रूपये पाव इतका होता. यंदा मात्र जांभूळप्रेमींना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. अर्थात जांभूळ खरेदी करताना ग्राहक मोलभाव करत असले तरी हे फळ वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे बदलापूरच्या जांभळांना ग्राहक पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Badlapur Jamun Price
kerosene shortage: अपुऱ्या केरोसीनने तोंडाला पुसली पाने

बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात स्थानिक जांभूळ विक्रेते मोठ्या प्रमाणात बसतात. या ठिकाणी जांभळ घेण्यासाठी बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. बदलापूर पश्चिमेकडील महालक्ष्मी तलावाजवळ सकाळी जांभळांचा मोठा बाजार भरतो. गेली अनेक वर्ष या ठिकाणी मुंबई आणि परिसरातील व्यापारी जांभूळ खरेदीसाठी येत असतात. जांभळाचा व्यापार करणारे तिसऱ्या पिढीतील व्यवसायिक फारुख खान यांनी सांगितले की, बदलापूरच्या जांभळांना मुंबईच्या बाजारात मोठी मागणी आहे.

बदलापूरच्या जांभळांना जीआय मानांकन मिळालं असलं तरी मुंबईत नाशिक, बडोदरा, कर्नाटक या भागातून विकायला येणारे जांभळाचे विक्रेते हे बदलापूरच्या नावानं जांभळं विकतात. मात्र दरवर्षी जांभूळ विकत घेणाऱ्या ग्राहकांना बदलापूरच्या जांभळांची चव आता कळली असून बदलापूरच्या जांभळांना मागणी वाढत असल्याचा फारुख खान यांनी सांगितले.

गरवा जांभळाला विशेष मागणी

जांभळाचा हंगाम हा गेल्या आठवड्याभरापासून सुरू झाला असून पावसाला जोरदार सुरुवात होईपर्यंत जांभळाची आवाक असणार आहे. त्यानंतर थेट पुढच्या वर्षी जांभूळ मिळतील त्यामुळे व्यापाऱ्यांकडून जांभळांची मागणी वाढल्याचाही फारुख खन यांनी सांगितले. गरवा जांभळाला विशेष मागणी असून दोन ते अडीच हजार रुपयांना पाटी सध्या विक्री होत आहे. जांभळांची आवक वाढल्यानंतर बाजारात आणखीन जांभळं उपलब्ध होतील. सध्या येणाऱ्या जांभूळांना मोठी मागणी असल्याचे फारुख खान यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news