Chamtoli Gram Panchayat: बदलापूरजवळ चामटोली ग्रामपंचायतीत सुट्टीच्या दिवशी संशयास्पद ‘ऑडिट’; दोन भामटे रंगेहात पकडले

महत्वाची कागदपत्रे गायब करण्याचा कट? ग्रामस्थांचा आरोप; बदलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

बदलापूर : बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात अजब कारभार घडला आहे. याठिकाणी सुट्टीच्या दिवशी ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्रं हाताळणाऱ्या दोन भामट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून महत्वाची कागदपत्रं चोरण्यासाठीच हा प्लॅन होता असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि या प्रकरणातील तक्रारदार धनाजी ईरमाळी यांनी केला आहे. या दोन संशयास्पद व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देत त्यांनी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्यांच्या बोलण्यातही विसंगती दिसून आली.

Gram Panchayat
Boisar Firing Case: बोईसर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर यवतमाळमध्ये अटकेत

गंभीर बाब म्हणजे तक्रारदार धनाजी ईरमाळी यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची माहिती मागितली होती. तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित काही प्रकरणं सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. त्यामुळे महत्वाची कागदपत्रं गहाळ करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानंच या व्यक्ती तिथे आल्या होत्या का ? असा सवालही धनाजी ईरमाळी यांनी उपस्थित केला आहे.

याप्रकरणी धनाजी ईरमाळी आणि चामटोलीतल्या ग्रामस्थांनी बदलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. तसेच अंबरनाथच्या गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनाही निवेदन देत ग्रामसेवक कैलास हेगडेंसह दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Gram Panchayat
Vasai Police Attack: वसईत ट्रिपलसीट कारवाईदरम्यान पोलिसावर प्राणघातक हल्ला

मुळात ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे दस्तऐवज हातळणाऱ्या या व्यक्ती कोण आहेत? कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी कागदपत्रांची हाताळणी केली? यावेळी ग्रामसेवक तसच जबाबदार शासकीय अधिकारी उपस्थित का नव्हते ? की तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे महत्वाची कागदपत्रं गायब करण्याचा हा प्लॅन होता का ? याची सखोल चौकशी होऊन दोर्षीवर गुन्हे दाखल करून करवाई करण्याची मागणी थांबतो येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Gram Panchayat
Wada Tyre Pyrolysis: वाडा तालुक्यात टायर पायरोलिसिस कारखान्यांचा उच्छाद; पर्यावरण धोक्यात

महिन्याभरापासून प्रशासक राज्य

ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचा मुदत संपल्यापासून ग्रामपंचायतचा कारभार हा प्रशासक म्हणजेच ग्रामसेवकांच्या हाती देण्यात आला आहे. आणि याच काळात माजी सदस्यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारावर उत्तर न देता उडवा उडवीचे उत्तर देण्यात येत असल्याचं धनाजी ईरमाळी यांनी सांगितलं. यामध्ये ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकास काम, तसेच जल जीवन योजना, यासह विविध परवानग्या बाबत माहिती मागवली असता ग्रामविकास अधिकारी कोणतीही माहिती देत नाहीत. माहिती अधिकारात माहिती मिळावी यासाठी तब्बल 48 हजार रुपये भरले आहेत. वास्तविक हि माहिती सहज उपलब्ध असतानाही ती माहिती आणि पुरावे नष्ट करायचे हेतूनच असला प्रकार घडला असल्याचख संशय चामटोलीच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news