Vasai Police Attack: वसईत ट्रिपलसीट कारवाईदरम्यान पोलिसावर प्राणघातक हल्ला

रेंज नाका परिसरात तरुणाचा दगडाने हल्ला; शासकीय कर्तव्यात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
Vasai Police Attack
Vasai Police AttackPudhari File Photo
Published on
Updated on

नालासोपारा : वसई पूर्व रेंज नाका परिसरात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vasai Police Attack
Pathardi Police Attack Case: पाथर्डी तालुक्यात पोलिस पथकावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 03 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका मोबाईल शॉपजवळ, रेंज नाका, वसई पूर्व येथे सहकारी पोलीस कर्मचारी विनोद माने यांच्यासह फिर्यादी पोलीस कर्मचारी ट्रिपलसीट कारवाई करत होते. यावेळी दुचाकीवरील चालक अभिषेक जैसवार (21) याने कारवाईस अडथळा निर्माण करत वाद घातला.

Vasai Police Attack
Tarapur MIDC: तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायूगळती; औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न

वादाचे रूपांतर अचानक हिंसक प्रकारात झाले. आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार मारहाण केली. फिर्यादी खाली पडल्यावरही आरोपीने दगडाने डोक्यावर अनेक घाव घालून गंभीर जखमी केले.

Vasai Police Attack
Boisar Firing Case | बोईसर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी यवतमाळमधून अटकेत

या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतला आहे.पुढील तपास सुरू आहे.दरम्यान कारवाई दरम्यान पोलिसांवर वारंवार होणारे हल्ले ही चिंतेचे बाब असून याविषयी कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news