Thane Crime : २.२७ लाखांचा 'हायड्रा गांजा' जप्त; २ अटकेत

दोघांच्या विरोधात कोपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

ठाणे : मुंब्रा परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडणाऱ्या तत्कालीन मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल शिंदे यांनी गुन्हे शाखा युनिट-१ पथकात नियुक्ती झाल्यानंतर ४ किलो 'हायड्रा गांजा' विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करून पुन्हा कारवाईचा धडाका सुरु केल्याचे चित्र आहे.

पोलीस पथकाने गणेश रामचंद्र मालुसरे (३७) व दर्शन सुनील जाधव (२१) याना अटक करून २ लाख २७ हजार ९०० किमतीचा ४.५३८ किलो 'हायड्रा गांजा' हस्तगत करण्यात आला. दोघांच्या विरोधात कोपरी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Nanded Crime : साडेदहा लाखांची बॅग पळवणारा चोरटा जेरबंद

ठाणे गुन्हे शाखा घटक-१ चे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गांधीनगर येथील स्वर्गीय सुरेश जाधव गार्डनसमोरील मैदान परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईत गणेश रामचंद्र मालुसरे (३७) व दर्शन सुनील जाधव (२१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Crime News
Nanded Crime News : आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश, ८ गुन्हे उघड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news